Samajwadi Party : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष (Samajwadi Party) यावेळी कोलकाता येथे आपली रणनीती आखणार आहे. पक्षाने 17 ते 19 मार्च दरम्यान कोलकाता (Kolkata) येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये 20 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनाही पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये सपा संसदीय मंडळही बनवू शकते अशी अपेक्षा आहे. हेच मंडळ निवडणुकीत उमेदवारांची निवड करून तिकीट निश्चित करते. कोलकाता येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची ही पाचवी बैठक आहे.
समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीची धोरणे आणि रणनीती यावर चर्चा होणार आहे. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीसह अनेक विशेष निमंत्रित पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबतही चर्चा होऊ शकते.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) १७ मार्चला कोलकाता येथे पोहोचणार आहेत. येथील कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करणार आहेत. यानंतर 18 आणि 19 मार्चला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. कोलकाता येथे अखिलेश पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचीही भेट घेऊ शकतात. सपा अध्यक्षांना ममता बॅनर्जींकडून सतत पाठिंबा मिळत आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीतही अखिलेश यांच्या समर्थनार्थ प्रचार करण्यासाठी ममता लखनऊमध्ये आल्या होत्या.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय आणि आर्थिक प्रस्ताव पारित केले जातील. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर पक्षाची ही पहिलीच बैठक असणार आहे. प्रदीर्घ काळानंतर काका शिवपाल सिंह यादवही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मंचावर दिसणार आहेत. सपा अध्यक्षांनी नुकतेच त्यांच्यासोबत त्यांचे काका शिवपाल यादव यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवले आहे.