Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात पोलिसांना यश, पाचव्या आरोपीला अटक

Salman Khan:  बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर काही दिवसापूर्वी गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली होती.

तर आता या प्रकरणात पोलिसांना मोठा यश मिळाला आहे पोलिसांनी राजस्थान मधून या प्रकरणातील पाचव्या आरोपीला देखील अटक केली आहे. मोहम्मद रफीद चौधरी असे या आरोपीचे नाव आहे. रफिक चौधरी यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे

रफिक चौधरीला राजस्थानहून मुंबईत आणले जात आहे. आता लवकरच आरोपींनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी रफिक चौधरीने शूटर सागर पाल आणि विक्की गुप्ता यांना पैसे दिले होते.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेने अनुज थापन, सोनू बिश्नोई, सागर पाल आणि विकी गुप्ता यांना अटक केली आहे. मात्र, 1 मे रोजी आरोपी अनुज थापन याने पोलिस बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. याशिवाय पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment