Sales on Car : 49 हजारांपर्यंत स्वस्तात खरेदी करा सर्वाधिक शक्तिशाली एसयूव्ही, सेफ्टीमध्ये मिळालेत 5 स्टार रेटिंग

Sales on Car : भारतीय बाजारात एकापेक्षा एक जबरदस्त एसयूव्ही लाँच होत आहेत. पण मागणी जास्त असलयाने या एसयूव्हीच्या किमती जास्त आहेत. पण तुम्ही आता स्वस्तात एसयूव्ही खरेदी करू शकता. तुम्ही 49 हजारांपर्यंत स्वस्तात कार खरेदी करू शकता. पहा यादी.

टाटा पंच

टाटा पंचच्या सुरक्षिततेच्या बाबतीत याला 5 स्टार रेटिंग मिळाले असून त्याची एक्स-शो रूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. कारमध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन आहे जे 86 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येत असून कार 20.1 KM/L मायलेज देते.

तर CNG मोडवर ते २७.१ किमी/किलो मायलेज देते. कारमध्ये डिस्क ब्रेक, ईबीडीसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि ड्युअल एअर बॅग यांसारखी फीचर्स दिली आहेत. सध्या, ही देशातील सर्वात जास्त विकली जाणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे कारण ती तुम्हाला प्रवासादरम्यान सुरक्षित ठेवते.

निसान

कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने याला ४ स्टार रेटिंग मिळाले आहे. किमतीचा विचार केला तर कारची एक्स-शो रूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. सुरक्षिततेसाठी, EBD सह ABS, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर आणि फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. मॅग्नाइटमध्ये दोन पेट्रोल इंजिन आहेत.

कारचे 1.0 लीटर पेट्रोल इंजिन 70 bhp पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करते. तर त्याचे 1.0-लिटर टर्बो पेट्रोल युनिट 97 bhp पॉवर आणि 160 Nm टॉर्क जनरेट करते. हे दोन्ही इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज असून टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये CVT गिअरबॉक्सची सुविधा देण्यात आली आहे. त्यात चांगली जागा असून ५ जण सहज बसतील.

रेनॉ किगर

किगर ही त्याच्या विभागातील सर्वात बोल्ड आणि स्टायलिश कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून सेफ्टीच्या दृष्टीने याला ४ स्टार रेटिंग मिळाले आहे. त्यात चांगली जागा उपलब्ध आहे. हे 1 लिटर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे जे 72PS पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. जास्त पॉवरसाठी, यात 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 100PS पॉवर आणि 160Nm टॉर्क जनरेट करते.

कारच्या दोन्ही इंजिनांना 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स दिला आहे. सुरक्षिततेसाठी, EBD सह ABS, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर आणि फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर सारखी फीचर्स दिली आहेत. कारची एक्स-शो रूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

ह्युंदाई EXTER

कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये, Hyundai EXTER वेगाने लोकांच्या मनात स्थान मिळवत आहे. किमतीचा विचार केला तर एक्स-शो रूम किंमत 6.13 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 1.2L काप्पा पेट्रोल इंजिन असून जे 83 PS ची पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क जनरेट करते, ते 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सने सुसज्ज असून कंपनीचा दावा आहे की ते 19.4 kmpl चे मायलेज देते तर CNG मोडमध्ये ते 27.1 km/kg मायलेज मिळेल.

नवीन एक्सेटरची रचना स्पोर्टी आणि बोल्ड असून त्याची समोरची रचना अतिशय आकर्षक आहे तर लूक अजिबात आकर्षक नाही. सेफ्टीसाठी यात 6 एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम यांसारखी फीचर्स दिली आहेत.

Leave a Comment