Sachin Tendulkar Birthday : टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज (Sachin Tendulkar Birthday) त्याचा 51वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी दिग्गज फलंदाजाने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके हा त्याचा सर्वात मोठा विक्रम आहे. पण सचिनने आणखी अनेक असे विक्रम केले आहेत जे जवळच्या काळात कोणत्याही क्रिकेटपटूकडून तुटणे अशक्य आहे.
सचिन तेंडुलकर हा सर्वाधिक 200 कसोटी सामने खेळणारा फलंदाज आहे. सध्या कसोटी क्रिकेट जास्त प्रमाणात खेळले जात नाही अशा स्थितीत एखाद्या खेळाडूने 100 कसोटी सामने खेळले तरी खूप मोठी उपलब्ध मानली जाते. मात्र इंग्लँडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आतापर्यंत 187 कसोटी सामने खेळला आहे. आता तो सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. आगामी काळात जेम्स अँडरसन सचिनचा सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम मोडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Sachin Tendulkar
सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 34 हजार 357 धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून सचिन ओळखला जातो. सचिनचा हा विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहे. सध्या विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे ज्याने 25000 धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहली इतक्यात निवृत्ती घेणार नाही. आणखी काही वर्षे तो क्रिकेट खेळत राहील. त्यामुळे विराट कोहली सचिनचा हा रेकॉर्ड मोडतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
T20 World Cup 2024 : पाऊस आला तरी सामना होणारच! ‘आयसीसी’चा नवा नियम काय?
सचिन तेंडुलकर हा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सर्वाधिक सामने खेळणारा फलंदाज आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत सर्व प्रकारचे क्रिकेट मिळून 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सध्या 500 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा पार करणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे.
सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे. तेंडुलकरने 664 सामन्यांच्या 782 डावांमध्ये फलंदाजी करताना 4 हजार 76 पेक्षा जास्त चौकार मारले आहेत. या यादीत श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. संगकाराने आतापर्यंत 3 हजार 15 चौकार मारले आहेत. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त अन्य खेळाडू अजून बरेच मागे आहेत.
Sachin Tendulkar
ICC Ranking List : फक्त ‘सूर्या’च! T20 यादीत पुन्हा मिळवला ‘हा’ मान; यशस्वीनेही केली कमाल
सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. तेंडुलकरने 264 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे. यामध्ये 100 शतके आणि 164 अर्धशतकांचा समावेश आहे.