Sabja Seeds : रक्तातील साखर नियंत्रित करतील ‘या’ बिया, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Sabja Seeds : आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेची आहे. अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर गेल्याने समस्या वाढू शकतात. पण साखर नियंत्रित करण्यासाठी सब्जा बिया फायदेशीर आहेत.

या बिया थोडे कठीण असल्याने ते खाणे शक्य होत नाही. त्यामुळे जेवण्यापूर्वी त्यांना काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा. विशेष म्हणजे या बियांचा रस किंवा शेकमध्येही वापर करता येतो.

हे छोटे काळे बिया आरोग्याशी निगडित विविध समस्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. विशेषत: रक्तातील साखर नियंत्रित करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. रक्तातील साखर नियंत्रणाशिवाय सब्जाच्या बियांचे इतर फायदे आहेत.

रक्तातील साखर नियंत्रण

सब्जाच्या बियांमध्ये फायबर असून जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. या बियांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

शरीराला मिळतो थंडावा

सब्जा बिया खाल्ल्या तर नैसर्गिकरित्या शरीर आतून थंड होते आणि उष्णतेपासून संरक्षण होते. वेगवेगळ्या कोल्ड्रिंक्समध्ये ते मिसळले तर उन्हाळ्यात ताजेपणा येतो.

निरोगी त्वचा

सब्जाच्या बियांत असणारे अँटिऑक्सिडंट त्वचेची जळजळ कमी करण्यास तसेच बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देण्यास मदत करतात. ते मुरुम आणि त्वचेच्या संसर्गासारख्या त्वचेशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर आहेत.

वजन कमी करण्यास फायदेशीर

सब्जाच्या बिया वजन कमी करण्यास उपयुक्त असून यात फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रित राहते. या बिया पाण्यात भिजवल्या तर त्या फुगतात त्यामुळे पोट लवकर भरते.

पचन सुधारते

सब्जाच्या बिया पचनासाठी फायदेशीर असून या बिया बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या पोटाच्या समस्या दूर होतात. यामध्ये असलेले फायबर पचन सुधारते आणि अनेक समस्यांवर फायदेशीर आहे.

पोषक तत्व

या बिया प्रथिने, जीवनसत्त्वे, ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आणि खनिजे यांसारखी आवश्यक पोषक तत्त्वे देत असून हे तुमच्या आहारातील पोषक घटकांचे प्रमाण वाढवण्यास मदत करू शकतात.

असे करा सेवन

तुम्ही या बिया फुगेपर्यंत 20-30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. भिजवलेल्या बिया सॅलडवर टाकून खाऊ शकता.
तसेच तूम्ही भिजवलेल्या बिया स्मूदी, लिंबूपाणी किंवा इतर पेयांमध्ये मिसळून पिऊ शकता.
सब्जाच्या बिया पुडिंग किंवा दह्यासाठी टॉपिंग म्हणून वापरू शकता.

Leave a Comment