मुंबई- शुक्रवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सात गडी राखून पराभूत होण्यासोबतच टीम इंडियाने यजमानांच्या हातून एकदिवसीय मालिकाही गमावली आहे.(SA vs IND: Exactly where India made a mistake, Gavaskar said the main reason for the defeat)
यापूर्वी कमकुवत समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताचा पराभव केला होता आणि आता एकदिवसीय सामन्यात देखील भारताला पराभुत केला आहे. एका खासगी वाहिनीशी केलेल्या संवादात अनुभवी सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी पराभवाच्या कारणांवर प्रकाश टाकला आहे.
गावसकर म्हणाले की खेळात हार आणि विजय होतच राहतात, मात्र पराभवातील फरक हा चिंतेचा विषय आहे. पूर्वी आमचे गोलंदाज जे सुरुवातीला किंवा मधल्या ओव्हर्समध्ये विकेट घेत असत ते आता होताना दिसत नाही पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती, मात्र संघाचा ज्या प्रकारे पराभव झाला आहे, ही चिंतेची बाब असल्याचे सनी म्हणाला.
येथील खेळपट्टीवर चेंडू फिरत असून बॅटवर चेंडू संथपणे येत असल्याचे सनीने सांगितले. आणि अशा खेळपट्ट्यांवर विकेट्स घ्यायच्या असतील तर चेंडूंना वेग आणावा लागेल, पण तसे झाले नाही. चहलने हे केले नाही आणि एकदा दक्षिण आफ्रिकेची लय तयार झाली की त्याला तोडणे कठीण झाले. भारतीय गोलंदाज विकेट घेऊ शकले नाहीत आणि ते अपयशी ठरले.(SA vs IND: Exactly where India made a mistake, Gavaskar said the main reason for the defeat)