दिल्ली : रशियाने मंगळवारी नाटोवर (NATO) खळबळजनक आरोप केला ज्यामुळे अणु युद्धाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. युक्रेनला अमेरिका आणि मित्र राष्ट्रांकडून मिळालेल्या मदतीला प्रत्युत्तर म्हणून रशियाने (Russia) हा आरोप केला आहे. खरं तर, मंगळवारी, अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांसह जर्मनीच्या विमानतळावर रशिया विरुद्धच्या युद्धात विजयासाठी आवश्यक असलेली शस्त्रे युक्रेनला देण्याचे वचन दिले.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, अणुयुद्धाचा धोका अजूनही कायम आहे. सोमवारी रशियाच्या चॅनल वन टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. लावरोव्ह यांनी पुन्हा सांगितले, की जानेवारीमध्ये, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (United Nations Security Council) 5 स्थायी सदस्यांनी आण्विक युद्धाच्या अस्वीकार्यतेवर विधान केले. पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रे दिल्याचा आरोपही त्यांनी केला, नाटो आघाडी रशिया विरोधात युद्धात होती. नाटो रशिया विरोधात युद्धात (War) गुंतला आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्र्यांच्या युक्रेनच्या भेटीनंतर अमेरिकेने युक्रेनला नवीन लष्करी मदत आणि राजनैतिक समर्थन जाहीर केले आहे. दोन्ही नेत्यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांच्या मार्गदर्शकांना सांगितले, की अमेरिका 30 कोटी डॉलरपेक्षा जास्त परदेशी लष्करी निधी देईल आणि 16.5 कोटी डॉलरच्या दारूगोळा विक्रीला देखील मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले होते, की “आम्ही युक्रेनला दिलेला मोठा पाठिंबा, रशियाविरुद्धचा प्रचंड दबाव आणि या प्रयत्नांमध्ये असलेल्या 30 पेक्षा जास्त देशांबरोबरच्या एकजुटीचे खरे परिणाम आहेत. रशियाच्या युद्ध उद्दिष्टांचा विचार केला तर रशिया अपयशी ठरत आहे. युक्रेन यशस्वी होत आहे. रशियाचे मुख्य उद्दिष्ट आहे की युक्रेनवर पूर्ण मात करणे, त्याचे सार्वभौमत्व काढून घेणे, त्याचे स्वातंत्र्य काढून घेणे. मात्र यामध्ये रशिया अयशस्वी ठरला आहे.”
बाब्बो.. ‘त्यामुळे’ वाढलेय जगाचे संरक्षण बजेट; पहा, अमेरिका, रशिया आणि भारताने किती केलाय खर्च..
रशिया यु्क्रेन युद्धावर अमेरिकी नेत्यांनी केली मोठी भविष्यवाणी; पहा, काय असेल युद्धाचा निकाल..