नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच आहे. आता तर एक नवे संकट उभे राहिले आहे. यंदाचा हिवाळा युक्रेनला भारी पडू शकतो. संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे की रशियाने युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर हमले केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. राजधानी कीव शहरातही दिवसभरातून फक्त अर्धा ते एकच तास वीज मिळत आहे. त्यामुळे येथील नागरिकांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. लोकांकडू आवश्यक प्रमाणात इंधन राहिलेले नाही. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे लाखो नागरिकांचे आयुष्य संकटात सापडले आहे. या दरम्यान राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी लोकांना ऊर्जा बचत करण्याचे आवाहन केले आहे.
‘युद्धाच्या या गंभीर काळात 1 कोटींपेक्षा अधिक रहिवासी विजेशिवाय राहत आहेत. ताज्या रशियन हल्ल्यांमुळे ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. त्याचवेळी झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत, सर्वांना मदत केली जात आहे. युक्रेनियन अभियंते मागील हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करून वीज यंत्रणा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असतानाच हा हल्ला झाला आहे.
युक्रेनमधील कीवमध्ये थंडीच्या मोसमातील पहिली हिमवृष्टी झाली आहे. काही दिवसांत येथे कडाक्याची थंडी पडेल. अशा परिस्थितीत वीज आणि पाणी टंचाईमुळे नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या वाढू शकते, असे झेलेन्स्की यांनी सांगितले. राष्ट्रपती म्हणाले की हल्ल्याच्या आदल्या दिवशी, युक्रेनियन सैन्याने सहा रशियन क्रूझ क्षेपणास्त्रे आणि पाच ड्रोन पाडण्यात यश मिळवले.
- वाचा : ‘त्यामुळे’ युद्धग्रस्त युक्रेन खुश..! रशियाला मात्र मोठा धक्का; पहा, काय म्हणालेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष
- पीएम मोदींनी ‘त्या’ संकटाकडे वेधले जगाचे लक्ष; रशिया-युक्रेन युद्धावरही दिला ‘हा’ संदेश; जाणून घ्या..