Russia Ukraine War : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रशियाचा जवळचा बेलारूसही (Belarus) मैदानात उतरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्य बेलारूसच्या सीमेवर आले आहे. बेलारूस हा युद्धग्रस्त युक्रेनचाही (Ukraine) शेजारी आहे. आता रशियन सैन्य बेलारूसी सीमेवरून युक्रेनला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. आता युक्रेनला रशियाविरुद्धच्या युद्धात नव्या आघाडीला सामोरे जावे लागू शकते. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी सोमवारी सांगितले, की त्यांच्या देशाच्या 60 हजार सैन्यांपैकी काही रशियन सैन्यासह बेलारूसमध्ये तैनात असतील.
रशियाने (Russia) युक्रेनवर आक्रमण तीव्र केले असताना बेलारूसने ही घोषणा केली आहे. रशियाने सोमवारी युक्रेनची राजधानी कीवसह आपल्या अनेक शहरांवर हल्ले करून नागरी ठिकाणांना लक्ष्य केले. राजधानी कीवमध्ये झालेल्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी नंतर सांगितले, की युक्रेनवरील हल्ले हे युक्रेनच्या दहशतवादी कारवायांना दिलेले प्रत्युत्तर होते.
व्लादिमीर पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक लुकाशेन्को यांनी कोणताही पुरावा न देता दावा केला की युक्रेन बेलारूसवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. बेल्टा वृत्तसंस्थेनुसार, राजधानी मिन्स्कमध्ये एका सुरक्षा बैठकीदरम्यान ते म्हणाले, की “मी आधीच सांगितले आहे की युक्रेन आज केवळ चर्चा करत नाही, तर बेलारूसच्या जमिनीवर हल्ल्याची योजना आखत आहे. अर्थात, युक्रेनियन लोकांना हे नक्की माहित असणे आवश्यक आहे. पण तरीही त्यांना आमच्या दक्षिण सीमेवर दुसरी आघाडी का उघडायची आहे? लष्कराच्या दृष्टिकोनातून हा वेडेपणा आहे.”
बेलारूसच्या इशाऱ्यानंतर, झेलेन्स्कीने सीमेवर आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची मागणी केली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी युक्रेन-बेलारूस सीमेवर आंतरराष्ट्रीय पाळत ठेवण्याचे आवाहन केले आहे. झेलेन्स्की, जी 7 देशांच्या (G7 Countries ) प्रमुखांसह बैठकीत उपस्थित होते, त्यांनी नेत्यांना सांगितले की त्यांनी बेलारूससह युक्रेनियन सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मिशन पाठवावे. G7 बैठकीदरम्यान, झेलेन्स्की यांनी नेत्यांना युक्रेनला रशियापासून संरक्षित करण्यासाठी हवाई संरक्षण प्रणाली देण्याचे तसेच रशियावर कठोर नवीन निर्बंध लादण्याचे आवाहन केले.
- Must Read : Russia Ukraine War : युक्रेन राष्ट्राध्यक्षांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रशिया भडकला; युक्रेनला थेट दिला ‘हा’ इशारा
- Russia Ukraine War : रशियाबाबत भारताने केला मोठा खुलासा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची ‘ती’ विनंती केली मान्य ?
- America : भारताच्या ‘त्या’ निर्णयामुळे वाढले अमेरिकेचे टेन्शन; अमेरिकन खासदारांनी केली ‘ही’ विनंती
- China Taiwan Tension : ‘त्या’ मुद्द्यावर चीनने पुन्हा धमकावले.. अमेरिकेचे नाव न घेता दिला ‘हा’ गंभीर इशारा