Russia Ukraine War : ‘युक्रेन’नंतर पुतिन यांचा नवा प्लॅन! आता ‘या’ देशावर कब्जा करण्याची तयारी?

Russia Ukraine War : रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला आता दोन वर्षे होत (Russia Ukraine War) आली आहेत. तरीदेखील या विनाशकारी यु्द्धाचा निकाल लागलेला नाही. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. या युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता आणखी एक मोहिम सुरू करण्याचा प्लॅन पुतिन यांच्या डोक्यात शिजत आहे. द सनने एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की पुतिन आता ट्रान्सनिस्ट्रियाचा समावेश करण्याचा प्रयत्न करू शकतात. ट्रान्सनिस्ट्रियाने 1990 मध्ये मोल्दोव्हापासून वेगळे होत स्वातंत्र्याची घोषणा केली होती. आता ट्रान्सनिस्ट्रियातील रशियाचे समर्थक ट्रान्सनिस्ट्रियाचा रशियात समावेश करण्याची मागणी करू शकतात.

डेनिस्टर नदीच्या काठावरील जमीनीचा पट्टा मोल्डोव्हा आणि युक्रेन (Ukraine) दरम्यान आहे. रशियाचे या (Russia) क्षेत्रात दोन हजार सैनिक आधीपासूनच तैनात आहेत. ट्रान्सनिस्ट्रियाची एकूण लोकसंख्या साडेचार लाखांपेक्षा जास्त आहे. हा प्रदेश रशियात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आहे असा दावा रशियाकडून अनेक वेळा करण्यात आला आहे. त्यांच्याकडे हजारो निमलष्करी दल आहे. जेव्हा त्यांना बोलावले जाते तेव्हा ते तयार असतात. पुतिन येत्या 29 फेब्रुवारी रोजी रशियन फेडरल असेंम्बीलमध्ये भाषण करणार आहेत. या दरम्यान ते ट्रान्सनिस्ट्रियाच्या विलीनीकरणाची घोषणा करू शकतात.

Pakistan News : सरकारचा नाही पत्ता पण, ‘उधारी’चा प्लॅन पक्का; पहा, काय घडतंय शेजारी

Russia Ukraine War

पुतिन यांच्या या भाषणाच्या एक दिवस आधी ट्रान्सनिस्ट्रियामध्ये स्थानिक राजकारण्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. रशियाला या बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल अशी शक्यता आहे. रशियाच्या या हालचालींवर विरोधी नेते गेनाडी चोरबा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पुतिन त्यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून ट्रान्सनिस्ट्रियाला रशियाला जोडण्याचा कट रचत आहेत असा आरोप चोरबा यांनी केला.

Russia Ukraine War

रशिया उर्वरित मोल्दोव्हाच्या विरुद्ध पुढे जाण्यासाठी तोडलेल्या प्रदेशाचा वापर करू शकतो. मोल्दोव्हाचे अध्यक्षांनी मागील वर्षी दावा केला होता की रशिया देशात सत्तापालट करण्याचा प्लॅन आखत आहे. मोल्दोव्हाच्या संसदेत पश्चिम समर्थकांचे बहुमत आहे आणि ते मोल्दोव्हाला युरोपीय संघात सहभागी करून घेऊ इच्छित आहेत. तर दुसरीकडे रशियाचे सैनिक मोल्दोव्हापासून वेगळे झालेल्या ट्रान्सनिस्ट्रियामध्ये त्यांची उपस्थिती वाढवत आहेत. अशा परिस्थितीत या प्रदेशात नवा संघर्ष उभा राहू शकतो.

Indian Cricket : क्रिकेट सोडलं, पॉलिटिक्स सुरू केलं; राजकारणात ‘या’ खेळाडूंचं नशीब चमकलं

Leave a Comment