Russia Ukraine War : युक्रेनविरुद्ध युद्ध (Russia Ukraine War) पुकारल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. अटक वॉरंट जारी झाल्यानंतर आता ते प्रथमच रशियातून बाहेर पडणार आहे. ते G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार नाहीत. मात्र, ऑक्टोबरमध्ये चीनचा (China) पहिला विदेश दौरा करण्याचे मान्य केले आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की पुतिन या वर्षाच्या अखेरीस बेल्ट अँड रोड फोरमसाठी चीनमध्ये पाऊल ठेवण्यास तयार आहेत. ब्लूमबर्गने नाव न सांगण्याच्या अटीवर एका स्त्रोताचा हवाला देत म्हटले आहे की रशियाच्या अध्यक्षांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर पुतिन यांच्या चीन भेटीची तयारी करत आहे.
वॉरंटनंतर पुतिन यांनी रशिया सोडला नाही, ते कुठेही दौऱ्यावर गेले नाहीत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने वॉरंट घोषित केल्यापासून पुतिन यांनी रशियाच्या आंतरराष्ट्रीय सीमा पार केल्या नाहीत. अलीकडे, पुतिन यांनी दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स शिखर परिषदेलाही हजेरी लावली नाही, कारण येथील स्थानिक सरकारने सांगितले की त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात स्वाक्षरी केल आहे म्हणून त्यांना अटक करण्याच्या आयसीसीच्या आदेशाचे पालन करेल.
त्याच वेळी, पुतिन यांनी सप्टेंबरमध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या आगामी G20 शिखर परिषदेपासून स्वतःला दूर केले. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या करारावर सही केलेली नाही. त्यामुळे पुतिन भारतात आले तरी काही फरक पडणार नाही. मात्र तरीही त्यांनी भारतात येणे टाळले आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून, पुतिन यांनी फक्त शेजारील काही देश आणि इराणचा दौरा केला आहे. कीवमध्ये लष्करी आक्रमण सुरू करण्यापूर्वी पुतिन यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये चीनचा दौरा केला होता. दुसरीकडे, शी जिनपिंग यांनी या वर्षी मार्चमध्ये मॉस्कोला भेट दिली, चीनचे अध्यक्ष म्हणून विक्रमी तिसर्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिला विदेश दौरा होता.
सूत्रांकडून ब्लूमबर्गला मिळालेल्या माहितीनुसार, पुतिन केवळ अशा देशांना भेट देण्यास इच्छुक आहेत जिथे त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी आहे आणि चीन त्यापैकी एक आहे. उल्लेखनीय म्हणजे, मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) पुतीन यांना ‘युक्रेनमधील परिस्थितीच्या संदर्भात’ अटक वॉरंट जारी केले होते.