नवी दिल्ली : युक्रेन युद्धात हजारो लोक मारले (Russia Ukraine War) गेले आणि लाखो विस्थापित झाले. मात्र रशियाचे म्हणणे आहे की, त्याला कोणतीही खंत नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांना युक्रेन युद्धाबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही कारण त्यांचा देश जे करत आहे ते “योग्य” आहे. यावेळी त्यांनी भारताचा उल्लेखही केला आहे. विशेष म्हणजे, युक्रेन युद्ध सुरू होण्याआधीपासूनच भारत हा मुद्दा शांततापूर्ण संवादाने सोडवावा असे म्हणत आहे.
भारताच्या प्रस्तावावर रशियाने (Russia) टाळाटाळ केली असली तरी शुक्रवारी प्रथमच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत सुरुवातीपासूनच शांततापूर्ण चर्चेच्या बाजूने असल्याचे मान्य केले. पुतिन यांनी भारतासोबत चीनचेही (China) नाव घेतले. दोन्ही देश शांततापूर्ण संवादाच्या बाजूने आहेत, असे ते म्हणाले. पुतिन यांची टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) उझबेकिस्तानमधील एका शिखर परिषदेत ‘हा काळ युद्धाचा नाही’ असे स्पष्टपणे सांगितले होते.
कझाकिस्तानच्या राजधानीच्या शहरात पत्रकार परिषदेत बोलताना पुतिन म्हणाले, की “भारत आणि चीन युक्रेनमध्ये शांततापूर्ण संवादाला पाठिंबा देतात.” मात्र, यावेळी त्यांनी युक्रेन चर्चेसाठी तयार नसल्याचे सांगितले. गेल्या महिन्यात उझबेकिस्तानमधील समरकंद शहरात झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीच्या प्रसंगी पीएम मोदींनी पुतीन यांच्याशी थेट चर्चा केली होती. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, ‘आपल्या सर्वांना माहित आहे की हा काळ युद्धाचा नाही आणि कोणताही प्रश्न चर्चेने सोडवला गेला पाहिजे’. युक्रेनमध्ये शांततापूर्ण चर्चेचे आवाहनही चीनने केले आहे.
पत्रकार परिषदेत पुतिन म्हणाले की, युक्रेनवरील आठ महिन्यांपासून चाललेल्या युद्धाबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप नाही. रशियाचा शेजारी “विनाश” करण्याचे उद्दिष्ट नाही. नाटो (NATO) सैन्याशी थेट संघर्ष विनाशकारी असेल. “सध्या, युक्रेनवर आणखी कोणतेही मोठे हल्ले करण्याचे नियोजित नाही.” जेव्हा पुतीन यांना विचारण्यात आले की त्यांना युक्रेनमधील संघर्षाबद्दल खेद वाटतो किंवा रशिया जे करत आहे ते योग्य आहे का ? यावर ते म्हणाले, की “नाही.” युक्रेनमधील संघर्षामुळे हजारो लोक मारले गेले, अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आणि लाखो लोक विस्थापित झाले, याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप नसल्याचे त्यांनी सांगितले.
पुतिन म्हणाले, “आज जे काही घडत आहे ते आनंददायी नाही. पण तरीही आमचीही अशीच स्थिती झाली असती. ज्यामुळे आमच्यासाठी परिस्थिती आणखी वाईट होईल. व्लादिमीर पुतिन यांनी पुढील योजनांबाबतही संकेत दिले असून, लष्करी प्रशिक्षित नागरिकांना लष्करात तैनात करण्याचा त्यांचा निर्णय दोन आठवड्यांत पूर्णतः अंमलात येईल. पुतिन यांच्या वक्तव्यापूर्वी, जर्मनीचे संरक्षण मंत्री क्रिस्टीन लॅम्ब्रेख्त यांनी म्हटले होते की, नाटो सहकाऱ्यांनी युक्रेनच्या पाठिंब्याने पुढे व्हावे आणि रशियाच्या अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या धमक्या गांभीर्याने घ्याव्यात.
युक्रेनमध्ये आपले सैन्य बळकट करण्यासाठी लष्करी-प्रशिक्षित नागरिकांना तैनात करण्याचा त्यांचा निर्णय दोन आठवड्यांत पूर्णपणे अंमलात येईल, असे पुतीन यांनी म्हटले आहे. पुतिन यांनी गेल्या महिन्यात हा आदेश दिला. पुतिन यांनी कझाकस्तानमधील एका परिषदेत उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांना सांगितले की 2,22,000 ते 3,00,000 लष्करी प्रशिक्षित नागरीकांना तैनात करण्याचा आदेश दिला आहे. यापैकी 33,000 आधीच लष्करी तुकड्यांमध्ये सामील झाले आहेत, तर 16,000 युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईचा भाग बनले आहेत.
पुतिन यांनी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, 65 वर्षांखालील जवळजवळ सर्व पुरुष लष्करी प्रशिक्षण घेतलेले नागरिक म्हणून नोंदणीकृत आहेत. या निर्णयावर सर्वसामान्यांमध्ये नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्राध्यक्षांच्या या आदेशानंतर हजारो लोकांनी रशिया सोडला आणि शेजारच्या देशांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली. रशियाने युक्रेनवर व्यापक हल्ले करण्याची गरज नसल्याचेही पुतिन यांनी सांगितले. ते म्हणाले, की रशियन सैन्य निवडकपणे आधीच निवडलेल्या लक्ष्यांना लक्ष्य करीत आहे.
- हे ही वाचा : Pakistan : ‘त्या’ संकटाने पाकिस्तान हैराण; भारताबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय; पहा, काय घडले
- Britain Heat Wave : इंग्रजांच्या देशात पुन्हा आलेय ‘ते’ संकट.. लोकांना मिळाला ‘हा’ धोक्याचा इशारा..
- America Big Deal : युद्धामुळे अमेरिकेची चांदीच; आता तैवानला देणार ‘इतक्या’ किंमतीची शस्त्रे
- North Korea : हुकुमशहाच्या देशात पुन्हा कोरोना.. पण, सरकारने दिलेय वेगळेच उत्तर; जाणून घ्या..