Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धा दरम्यान (Russia Ukraine War) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी मोठी घोषणा केली आहे. बुधवारी त्यांनी युक्रेनच्या चार प्रांतात लष्करी राजवट (Marshal Law) जाहीर केली. गेल्या महिन्यात पुतिन यांनी या प्रांतांचे रशियात विलीनीकरण करण्याची घोषणा केली. सार्वमतानंतर व्लादिमीर पुतिन म्हणाले, की हे प्रदेश आता रशियाचे (Russia) आहेत. व्लादिमीर पुतिन यांनी एक समन्वय परिषद तयार करण्याचे आदेश दिले आहेत जे युक्रेनमधील रशियन राजवटीशी समन्वय साधण्यासाठी काम करेल.
पुतीन म्हणाले, “आम्हाला रशियाच्या भविष्यासाठी खूप कठीण कार्ये पूर्ण करायची आहेत आणि या समस्येवर तोडगा काढायचा आहे.” युक्रेनमधील (Ukraine) खेरसनसह अनेक ठिकाणी रशियन सैन्याचा (Russian Army) पराभव झाल्यानंतर हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. पुतिन म्हणाले की, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, उद्योग आणि उत्पादन वाढवण्यासाठी या घोषणा करण्यात आल्या आहेत. यापूर्वी रशियाने खेरसनमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. युक्रेन येथे हल्ला करू शकतो, त्यामुळे सर्व नागरिकांनी शहर सोडावे, असे रशियाने म्हटले होते.
युक्रेनच्या जवळ असलेल्या आठ प्रांतांतील लोकांना बाहेर पडू दिले जाणार नाही, असेही पुतीन यांनी जाहीर केले आहे. त्यात क्रॅस्नोडार, बेल्गोरोड, ब्रायन्स्क, व्होरोनेझ, कुर्स्क आणि रोस्तोव्ह यांचा समावेश आहे. रशियाने युक्रेनच्या चार प्रांतात सार्वमत घेतले तेव्हाही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. बंदुकीच्या जोरावर लोकांना मतदान करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप पाश्चात्य देशांनी केला.
रशियाने ज्या चार प्रांतांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली त्यामध्ये लुहान्स्क, डोनेत्स्क, खेरसन आणि झापोरिजिया यांचा समावेश आहे. यातील लुहान्स्क, डोनेत्स्क येथे रशिया आधीच हक्क सांगत आहे. त्याच वेळी, खेरसन प्रांतही रशियासाठी जास्त महत्वाचा आहे.
- वाचा : Russia-Ukraine War: भारतीय दुतावासाचा भारतीय नागरिकांना हा देश सोडण्याचा सल्ला…
- Joe Biden On Pakistan: हा देश आपल्या सर्वांसाठी धोकादायक! त्याला लगाम घालणे आवश्यक; राष्ट्राध्यक्ष बायडेनचे वक्तव्य
- China Taiwan Tension : चीनच्या धमक्यांवर तैवान भडकला; चीनी राज्यकर्त्यांना दिले ‘हे’ उत्तर..
- Russia Ukraine War : रशियाचे भारत-चीनबाबत मोठे वक्तव्य; पहा, ‘त्या’ मुद्द्यावर काय म्हणाले पुतिन