Russia Ukraine War : दोन आठवड्यांत देश सोडा; युद्धग्रस्त रशिया-युक्रेनच्या नागरिकांना ‘या’ देशाचा आदेश

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन (Russia Ukraine War) वर्षांनंतरही संपलेलं नाही. अजूनही ठिकठिकाणी हल्ल्याच्या बातम्या येतच आहेत. या युद्धामुळे दोन्ही देशांत मोठे नुकसान झाले आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेनचे (Ukraine War) जास्त नुकसान झाले आहे. लाखो नागरिकांना देश सोडणे भाग पडले आहे. या दोन्ही देशांतील नागरिक अन्य देशांत आश्रय घेऊन राहत आहेत. श्रीलंकेत या (Sri Lanka) नागरिकांची संख्या जास्त आहे. रशियातील तीन लाख तर वीस हजार युक्रेनियन नागरिक श्रीलंकेत आश्रयाला आहेत. आता या नागरिकांसाठी टेन्शन देणारी बातमी आली आहे. (Russia Ukraine War-Sri Lanka said 3 lakh Russian and 20 Thaousand Ukrenian civilian to leave the country)

श्रीलंका सरकारने या नागरिकांना दोन आठवड्यांत देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. 23 फेब्रुवारी रोजी हे आदेश देण्यात आले आहेत. श्रीलंकेने युद्धामुळे विस्तारित व्हिसावर देशात राहणाऱ्या हजारो रशियन आणि युक्रेनियन पर्यटकांना दोन आठवड्यांच्या आत देश सोडण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमिग्रेशन कंट्रोलरने पर्यटन मंत्रालयाला नोटीस बजावून कळवले आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की रशियन आणि युक्रेनियन पर्यटकांना 23 फेब्रुवारीनंतर पुढील दोन आठवड्यांत देश सोडावा लागेल कारण त्यांचा व्हिसाची मुदत संपली आहे.

Ukraine Russia War | विनाशकारी युद्धाची दोन वर्षे; उद्धवस्त शहरे, हजारोंचा मृत्यू, अन् लाखो लोक बेघर

Russia Ukraine War

तथापि, अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या कार्यालयाने एक परिपत्रक जारी केले की त्यांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय वाढीव व्हिसा रद्द करण्याचा निर्णय कसा घेतला गेला याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रेसिडेंशियल मीडिया डिव्हिजनने सांगितले की, श्रीलंका सरकारने या पर्यटकांना यापूर्वी दिलेली व्हिसा मुदतवाढ रद्द करण्याचा अधिकृत निर्णय घेतलेला नाही.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या (Russia Ukraine War) उद्रेकामुळे दोन्ही युरोपीय देशांतील पर्यटकांना देशात दीर्घकाळ राहण्याची परवानगी देण्यात आली. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून सुमारे 3 लाख रशियन आणि 20 हजार युक्रेनियन नागरिक श्रीलंकेत आले आहेत. दोन वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे बरीच जीवित आणि वित्तहानी झाली आहे. यासोबतच दोन्ही देशांतून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याचे दिसून आले आहे.

Israel Hamas War : गाझा हादरलं! मदतीच्या प्रतिक्षेतील लोकांवर इस्त्रायलचा हल्ला; ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

Russia Ukraine War

ब्बल 65 लाख लोक विस्थापित; घरे इमारती उद्धवस्त 

या युद्धामुळे दोन वर्षात मोठा विध्वंस घडला आहे. अनेक शहरांमध्ये घरे आणि इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. यु्क्रेनला याचा जास्त फटका बसला आहे. युद्धाच्या सुरुवातीपासूनच रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रे, ड्रोन, बॉम्बद्वारे हल्ले केले. रशियाने युद्ध पुकारल्यामुळे आतापर्यंत 1.4 कोटी लोकांनी युक्रेन सोडले आहे. तर सुमारे 37 लाख लोक विस्थापित झाले आहेत. त्यांना अन्य देशात आश्रय घेणे भाग पडले आहे. यातील काही लोक पुन्हा देशात परतले आहेत. युक्रेन सोडलेले जवळपास 65 लाख लोक अजूनही अन्य देशात शरणार्थी म्हणून राहत आहेत.

ज्यावेळी रशियाने यु्क्रेनवर हल्ला केला तेव्हा असे वाटत होते की काही दिवसांतच युद्ध संपेल. परंतु, या युद्धात युक्रेनच्या बाजूने अमेरिका, ब्रिटेन यांसह अन्य देश युरोपियन युनियनची ताकद होती. त्यामुळे रशियाला अजूनही युक्रेनचा पाडाव करता आलेला नाही. युक्रेनच्या सैन्याने अनेक ठिकाणांहून रशियाच्या सैन्याला हुसकावून लावले आहे.

Russia Ukraine War

युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर वीस हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. 11 हजार लोक अजूनही बेपत्ता आहेत. मृत आणि जखमी युक्रेनियन सैनिकांची संख्या 3 लाख 60 हजार इतकी आहे. या युद्धात मरण पावलेल्या आणि जखमी झालेल्या रशियन सैनिकांची संख्याही 3 लाख 30 हजारांच्या आसपास आहे.

China Sri Lanka Relation : भारताचा आदेश अन् छोटा देशही चीनला भिडला; पहा, कशामुळे ‘चीन’ भडकला?

Leave a Comment