Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्ध (Russia Ukraine War) अजूनही संपलेले नाही. महिनाभरापूर्वी युक्रेनच्या लष्कराने रशियाला खार्किवसारख्या मोठ्या शहरातून हुसकावून लावले होते आणि त्याला रशियन सैन्याचा (Russian Army) पराभव म्हणून प्रसिद्धी देण्यात आली होती. आता रशियन सैन्य पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी खार्किववर कब्जा केल्याचा दावा केला आहे. मंगळवारी रशियन सैन्याने खार्किव ताब्यात घेतल्याचा दावा केला. रशियाच्या (Russia) संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, “रशियन लष्करी तुकड्यांनी खार्किवमधील गोरोबिवकावर कब्जा केला आहे.” हे तेच क्षेत्र आहे जिथून रशियन सैन्याला माघार घ्यावी लागली होती.
दरम्यान, मंगळवारी रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने (Ukraine) केला आहे. रशियाने एका पॉवर स्टेशनला लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागले, त्यात दोन जण ठार झाले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हल्ल्याच्या परिणामी स्फोट, आग आणि वीज खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत. क्षेपणास्त्र डागल्यानंतर वीज केंद्राजवळ गडद काळा धूर उठताना दिसला. त्यामुळे अनेक भागातील दिवे बंद झाले, मात्र नंतर पुरवठा पूर्ववत झाला. या हल्ल्यात दोन जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याचे कीव प्रशासनाचे म्हणणे आहे.
रशिया नागरिकांना धमकावण्याचा आणि मारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, रशियाच्या हवाई हल्ल्यात युक्रेनची 30 टक्के वीज केंद्रे उद्ध्वस्त झाली आहेत. रशिया 10 ऑक्टोबरपासून आक्रमक आहे. स्थानिक अधिकार्यांनी सांगितले की, मंगळवारच्या हल्ल्यांमध्ये खार्किवमधील वीज प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले. उत्तरेकडील झिटोमिर शहरात वीज आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
रशियाने युक्रेनची राजधानी कीव आणि आसपासच्या शहरांमध्ये ड्रोनद्वारे जोरदार हल्लेही केले आहेत. हे ड्रोन 2,000 किमी पर्यंत प्रवास करतात आणि लक्ष्याजवळ स्फोट करतात. त्यामध्ये 80 किलोपर्यंत स्फोटके असतात. परिणामी इमारती कोसळतात. या हल्ल्यांमुळे युक्रेनचे मोठे नुकसान होत असून रशियाला आपल्या शक्तीचा जास्त वापर करावा लागत नाही. गेल्या काही वर्षांपासून जगभरात ड्रोन युद्धाचा सराव सुरू झाला आहे. भारतानेही या तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे.
- Read : Ukraine Russia War : युद्धाचा धोका वाढला..! अमेरिका युक्रेनला करणार आधिक शक्तीशाली; पहा, काय देणार मदत
- Russia Ukraine War : रशियाचे भारत-चीनबाबत मोठे वक्तव्य; पहा, ‘त्या’ मुद्द्यावर काय म्हणाले पुतिन
- China Taiwan Tension : चीनच्या धमक्यांवर तैवान भडकला; चीनी राज्यकर्त्यांना दिले ‘हे’ उत्तर..