Russia Ukraine War : आज म्हणजेच मंगळवारी (दि.21) रशिया-युक्रेन युद्धाला (Russia Ukrain e War) एक वर्ष पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियाच्या संसदेत भाषण केले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांच्या युक्रेन भेटीच्या एक दिवसानंतर पुतिन यांचे भाषण झाले. यामध्ये त्यांनी युक्रेनसोबतच्या (Ukraine War) युद्धासंदर्भात अनेक मोठे वक्तव्य केले.
रशियाच्या (Russia) संसदेला संबोधित करताना पुतिन म्हणाले की, ही समस्या शांततेने सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या कठीण प्रसंगात आम्ही शांततेने वाटाघाटी करत होतो. पण आमच्या पाठीमागे एक वेगळेच षडयंत्र रचले जात होते. आम्ही आमच्या हिताचे आणि देशाचे रक्षण करतो.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
पुतिन यांनी त्यांच्या भाषणात दावा केला, की युक्रेनने लष्करी कारवाईतून शस्त्रास्त्र पुरवठ्याबाबत पश्चिमेशी वाटाघाटी केल्या होत्या. पाश्चिमात्य देशांनी आपल्याच लोकांचा विश्वासघात केला आहे. ते म्हणाले, की ‘मी यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे की, युक्रेनचे लोक या देशावर राजकीय, लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या कब्जा करणाऱ्या पाश्चात्य देशांचे ओलिस बनले आहेत.’
पुतिन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉनबास प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले. 2014 पासून हा एक अतिशय संवेदनशील प्रदेश राहिला आहे. युक्रेनमध्ये सतत हल्ले होत असतानाही डॉनबासचे लोक एक वर्ष टिकून राहिले. त्याला आशा होती की रशिया त्याच्या संरक्षणासाठी येईल. पण आमच्या पाठीमागे वेगळेच षडयंत्र रचले जात होते. पाश्चिमात्य देश हे या युद्धाचे दोषी आहेत आणि ते रोखण्यासाठी आम्ही केवळ लष्कराचा वापर करत आहोत, असे पुतिन म्हणाले.