Russia Ukraine War : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी मंगळवारी सांगितले की, दोन हजार डॉलरचे दरडोई उत्पन्न असलेला भारत (India) रशिया-युक्रेन संघर्षामुळे (Russia Ukraine War) तेलाच्या वाढत्या किमतींबद्दल (Oil Price) काळजीत आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर म्हणाले की, विकसनशील देशांमध्ये त्यांच्या ऊर्जेच्या गरजा कशा भागवल्या जातील याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
युक्रेन युद्धाबाबत ते म्हणाले की, हा संघर्ष कोणाच्याही हिताचा नाही अशी खासगी, सार्वजनिक, गोपनीय आणि सातत्यपूर्ण भूमिका आम्ही घेतली आहे. ते म्हणाले की, संवाद आणि मुत्सद्देगिरीकडे परत जाणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. “आम्ही तेलाच्या किमतीबद्दल काळजीत आहोत, परंतु आमची दरडोई अर्थव्यवस्था $2,000 आहे. तेलाच्या किमती आमच्यासाठी त्रासदायक ठरत आहेत आणि हीच आमची सर्वात मोठी काळजी आहे. भारताने रशियाकडून लष्करी उपकरणे खरेदी करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले, की “आम्ही आमची लष्करी उपकरणे कोठून मिळवायची हा मुद्दा नाही, हा मुद्दा काहीही असो, तो भौगोलिक-राजकीय परिस्थितीमुळे बदलला आहे.”
दरम्यान, रशिया युक्रेन युद्धाला सहा महिने उलटून गेले तरीही युद्ध संपलेले नाही. या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे. गरीब आणि विकसनशील देशांना आधिक फटका बसला आहे. या देशांतील नागरिक काही कारण नसताना या संकटात भरडले जात आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमती, पुरवठा साखळी विस्कळीत होणे, वाढत जाणारी महागाई अशी संकटे या युद्धाने आधिक तीव्र केली आहेत.