Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू होऊन ६ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. दोन्ही देशांत सुरू झालेले हे युद्ध (War) अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, युक्रेनियन मोठ्या संख्येने देश सोडून गेले होते. तिथे अजूनही परिस्थिती चांगली नाही. रशियन आणि युक्रेनचे सैन्य दररोज एकमेकांचा सामना करत आहेत. दरम्यान, युक्रेनमधील युद्धादरम्यान झालेल्या मृतांची संख्या संयुक्त राष्ट्राने (United Nations) जाहीर केली आहे. त्यांच्या मते, युक्रेनमधील युद्धात आतापर्यंत 5,916 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 8616 जण जखमी झाले आहेत.
रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सुरू असलेल्या युद्धात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. नागरिक मोठ्या संख्येने दगावले आहेत. युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स एजन्सीचा असा अंदाज आहे, की ही आकडेवारी आणखी जास्त असू शकते. कारण काही शहरांत किती मृत्यू झाले याची माहिती अद्याप उपलब्ध नाहीत. यास आणखी वेळ लागू शकतो. यासोबतच अनेक ठिकाणी नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या माहितीलाही दुजोरा मिळू शकलेला नाही.
मंगळवारी रशिया-नियंत्रित युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिणेकडील प्रदेशांनी रशियाचा अविभाज्य भाग होण्यासाठी सार्वमत घेण्याची घोषणा केली. युक्रेनच्या फुटीरतावादी चार प्रदेशांनी रशियाच्या पाठिंब्याने संघटित आणि रशियाचा भाग बनण्याचा हा प्रयत्न रशियाला युक्रेनशी युद्ध तीव्र करण्याचा आधार देईल. तेही जेव्हा युक्रेनच्या सैन्याला आपले प्रदेश ताब्यात घेण्यात यश मिळत आहे.
डोनेत्स्क, लुहान्स्क, खेरसन आणि अंशतः रशियाच्या ताब्यात असलेल्या झापोरिझिया प्रदेशाने शुक्रवारी सार्वमताची घोषणा केली. त्यांचे निकटवर्तीय रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी याची गरज सांगितल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. त्याच वेळी, युद्ध सुरू होऊन सात महिन्यांनंतर, रशियाचा पराभव होताना दिसत आहे.
रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवदेव यांनीही सांगितले की, पूर्व युक्रेन प्रदेशांचे रशियामध्ये विलीनीकरण करणे आणि त्यांच्या सीमा पुन्हा परिभाषित करणे अपरिवर्तनीय आहे आणि रशियाला त्यांच्या संरक्षणासाठी कोणतीही पावले उचलण्यास सक्षम करेल. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी हे सार्वमत योग्य नसल्याचे ट्विट केले. युक्रेनला आपले प्रदेश मुक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि रशियाने काहीही म्हटले तरी ते मुक्त करत राहतील. असे सार्वमत रशियाच्या बाजूने जाईल हे जवळपास निश्चित आहे, परंतु युक्रेनच्या लष्कराला पाठिंबा देणारी पाश्चात्य सरकारे त्याला मान्यता देणार नाहीत. युक्रेनचे सैन्य पुढाकार घेत असताना या सार्वमतामुळे रशियाला लढाई तीव्र करण्याची संधी मिळणार आहे.