दिल्ली : रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारले आहे. आज 19 दिवसांनंतरही युद्ध थांबलेले नाही. या काळात रशियाने युक्रेनचे अतोनात नुकसान केले आहे. तर दुसरीकडे रशियाचेही मोठे नुकसान होत आहे. रशियाच्या या कृत्यामुळे जगातील अनेक देशांनी रशियावर अत्यंत कठोर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. या निर्बंधांचा फटका रशियाला बसत आहे. रशियावर रोजच नवीन निर्बंध टाकले जात असल्याने आजमितीस रशिया हा जगातील सर्वाधिक निर्बंधांचा सामना करणारा देश ठरला आहे. या युद्धामुळे रशिया तर आता कंगाल होण्याच्या मार्गाने निघाला आहे.
होय, रशियन सरकारमधील अर्थमंत्री अँटोन सिलुआनोव्ह यांनी म्हटले आहे, की युक्रेन विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या काळात देशातील सुमारे 640 अब्ज डॉलर्स किंमतीच्या सोने आणि परकीय चलन साठ्यातील जवळपास निम्मी संपत्ती फ्रीज केली गेली आहे. त्यामुळे आता रशिया त्याच्या कर्जदारांना रुबल (रशियाचे चलन) देईल. युक्रेनवर रशियाच्या हमल्यानंतर पाश्चात्य देशांनी देशावर अनेक निर्बंध लादले आहेत, या निर्बंधात त्यांची मालमत्ता गोठवली गेली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा मार्गदर्शक जॅक सुलिव्हन यांनी म्हटले आहे की, युक्रेनमध्ये रशियन आक्रमणाने सीमा पार करुन नाटो सदस्य राष्ट्रांवर हमला केल्यास रशियाला नाटोच्या प्रत्युत्तराचा सामना करावा लागेल. रशिया आणि युक्रेनचे प्रतिनिधी यांच्यात आज पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती स्पुतनिक या वृत्तसंस्थेने दिली आहे.
दरम्यान, जगभरातील कठोर निर्बंधांचा (Sanction against Russia) सामना करणाऱ्या देशांमध्ये रशिया पहिल्या क्रमांकावर आहे. युक्रेनवरील हमल्यानंतर (Ukraine-Russia War) अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. त्यानंतर रशिया जगातील सर्वाधिक निर्बंधांचा सामना करणारा देश बनला आहे. रशियावर लादल्या जाणाऱ्या या निर्बंधांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नेटफ्लिक्स, अमेरिकन एक्सप्रेस, मास्टरकार्ड आणि व्हिसा कार्डसह अनेक अमेरिकन कंपन्यांनी रशियामधील त्यांच्या सेवा निलंबित केल्या आहेत. युद्ध जसे वाढत आहे, तसे रशियावरील निर्बंध सातत्याने वाढत आहेत. या निर्बंधांमुळे रशियाचेही मोठे नुकसान होत आहे. अमेरिका आणि युरोपिय देश या गोष्टींचा विचार करुन रशियाचे जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बाब्बो.. युक्रेन युद्धाचा रशियालाही बसलाय जोरदार दणका..! रशिया ‘तिथे’ ठरलाय नंबर वन..
Russia Ukraine War : रशिया विरोधात अमेरिकेचा नवा प्लान तयार; पहा, आता अमेरिका काय करणार..?