दिल्ली : युक्रेनच्या एका शहरात झालेल्या हिंसाचारानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या तातडीच्या बैठकीत रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार गटातून (UNHRC) बाहेर काढण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने हा निर्णय घेतला आहे. रशियाला वगळण्याच्या बाजूने 93 मते पडली, तर भारताने या मतदानात भाग घेतला नाही. रशियाने या बैठकीचे वर्णन पाश्चिमात्य देशांनी रशिया विरोधात रचलेला एक कट आहे, असे म्हटले. बैठकीआधी रशियाने सर्व सदस्य राष्ट्रांना पाश्चात्य देशांनी आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी तयार केलेल्या मानवाधिकार चौकटीच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते.
रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेतून बाहेर काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेच्या अगोदर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी सांगितले होते, की वारंवार चिथावणी दिल्यानंतरही रशिया कीवशी चर्चा सुरू ठेवेल. दुसरीकडे, युक्रेनच्या वतीने संयुक्त राष्ट्र महासभेत उपस्थित असलेल्या प्रतिनिधीने सांगितले की, रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेतून बाहेर काढणे हा पर्याय नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. रशियाला मानवाधिकार संघटनेतून वगळण्यासाठी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. युक्रेनच्या प्रतिनिधीने सांगितले, की आपण अशा विचित्र परिस्थितीत अडकलो आहोत की संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचा सदस्य देश एखाद्या देशाच्या सीमेत अतिक्रमण करुन मानवी हक्कांचे नियम मोडत आहे. इतकेच नाही तर तो तेथे युद्ध गुन्हा करत आहे जो मानवतेविरुद्ध आहे.
दरम्यान, रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्यामागे नाटो हे सर्वात मोठे कारण आहे. युक्रेनने नाटोमध्ये सामील होऊ नये असे रशियाने वारंवार सांगितले आहे. खरे तर युरोपला सोव्हिएत युनियनपासून संरक्षित शीतयुद्धाच्या सुरुवातीला नाटो नावाची संघटना स्थापन करण्यात आली होती. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की याआधी म्हणाले होते, की रशियाशी एक महिन्याहून अधिक काळ चाललेल्या युद्धा दरम्यान युद्धविराम, रशियन सैन्याची माघार आणि सुरक्षा हमी या बदल्यात नाटोचे सदस्यत्व न घेण्याच्या युक्रेनच्या वचनबद्धतेवर चर्चा करण्यास ते तयार आहेत.
युक्रेनचे अध्यक्ष पाश्चात्य देशांवर भडकले..! रशियाबाबही दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; जाणून घ्या..