Russia : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पुन्हा एकदा पाश्चात्य देशांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी मंगळवारी सांगितले की, पाश्चात्य देश आशिया-पॅसिफिक प्रदेशात नाटोसारख्या (NATO) प्रणालींचा विस्तार करू पाहत आहेत. एवढेच नाही तर युक्रेनसोबत (Ukraine) सुरू असलेल्या संघर्षावरही त्यांनी भाष्य करत अमेरिकेच्या (America) हस्तक्षेपावरही निशाणा साधला आहे. तैवानचाही (Taiwan) उल्लेख केला.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मॉस्को आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत स्वागत भाषण देताना पुतिन म्हणाले की, पाश्चात्य देश आशिया-पॅसिफिक प्रदेशात “नाटो सारखी प्रणाली” वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. युक्रेनमधील संघर्ष लांबविण्याचा अमेरिका प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले. पुतिन यांनी असेही म्हटले आहे, की अमेरिकन हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांची या महिन्याच्या सुरुवातीला तैवानची भेट पूर्णपणे नियोजित आणि खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाची होती.
या परिषदेत बोलताना पुतिन यांनी लॅटिन अमेरिका, आशिया () आणि आफ्रिकेसह सहकारी देशांना आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करणार असल्याची घोषणाही केली आहे. पुतिन यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशाला आपल्या साथीदारांचे महत्त्व समजले आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या देशाकडे प्रगत शस्त्रास्त्रांची कमतरता नाही, असा संदेशही पुतीन यांनी आपल्या भाषणातून जगाला दिला.
युक्रेनशी युद्ध सुरू (War) असताना, चीन (China) आणि तैवानमध्ये तणाव सुरू असताना पुतिन यांनी या सर्व मुद्द्यांवर आपले म्हणणे व्यक्त केले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला (Russia Ukraine War) 6 महिने झाले असून पुतिन यांनी असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, या युद्धात रशियाचे (Russia) मोठे नुकसान झाले आहे.
पुतिन म्हणाले की, त्यांच्या देशाने उत्तर कोरियासोबत (North Korea) सर्वसमावेशक आणि रचनात्मक द्विपक्षीय संबंधात वाढ करण्याचा संकल्प केला आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांना लिहिलेल्या पत्रात पुतिन म्हणाले की, रचनात्मक द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी पावले उचलणे दोन्ही देशांच्या हिताचे असेल. याला उत्तर देताना किम जोंग उन यांनीही त्यांची मैत्री अधिक घट्ट होईल असे सांगितले.