Russia President Election : रशियातही निवडणुकांची धामधूम; मतदान सुरू, कोण होणार राष्ट्राध्यक्ष?

Russia President Election : भारतात आज केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election) घोषणा केली. देशात एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. भारताचा मित्रदेश रशियातही निवडणूक (Russia President Election) सुरू आहे. पण ही निवडणूक राष्ट्राध्यक्षपदासाठी आहे. या निवडणुकीसाठी मतदान सुरू असून उद्यापर्यंत (रविवार) मतदारांना मत देता येईल. या निवडणुकांकडे फक्त औपचारिकताच म्हणून पाहिले जात आहे. कारण, विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हेच विजयी होतील असे निश्चित मानले जात आहे.

रशियातील यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका वेगळ्या आहेत. यामागे काही कारणेही आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध (Russia Ukraine War) सुरू असतानाच या निवडणुका होत आहेत. पुतिन यांच्याविरोधात विरोधी नेताच राहिलेला नाही. तर दुसरीकडे तीन दिवस मतदान हे पहिल्यांदाच घडत आहे. या निवडणुकीत पुतिन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. येथे राष्ट्राध्यक्ष निवडीची प्रक्रिया वेगळी आहे. पॉप्यूलर मतांचे आधारे राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाते.

Russia Ukraine War : दोन आठवड्यांत देश सोडा; युद्धग्रस्त रशिया-युक्रेनच्या नागरिकांना ‘या’ देशाचा आदेश

Russia President Election

जर एखाद्या उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली तर तो राष्ट्रपती म्हणून निवडला जातो. जर उमेदवार जास्त असतील आणि कुणालाच 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत तर अशा परिस्थितीत तीन आठवड्यांनंतर पुन्हा निवडणुका घेतल्या जातात. यामध्ये आघाडीवरील 2 उमेदवारांमधून राष्ट्राध्यक्षपदासाठी एकाची निवड केली जाते.

पुतिन आतापर्यंत चार वेळेस राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. सन 2000 मध्ये पुतिन पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळी त्यांना 54 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर 2004 मध्ये 72 टक्के, 2012 मध्ये 65 टक्के आणि 2018 च्या निवडणुकीत 77 टक्के मते मिळाली.

Russia President Election

Sweden Joins NATO : रशियाला धक्का! ‘नाटो’ संघटनेत आणखी एका देशाची एन्ट्री; अमेरिकेचा प्लॅन यशस्वी

रशियात पुतिन यांना एक कठोर नेता म्हणून ओळखले जाते. देशात त्यांच्या लोकप्रियतेमागे हे एक मोठे कारण आहे. रशिया युक्रेन युद्धात त्यांच्यावर युद्ध गुन्ह्याचे आरोप लागले असताना रशियातील एक मोठा वर्ग आजही त्यांच्या पाठिशी उभा आहे. रशियन नागरिकांना असे वाटते की अमेरिका आणि युरोप सारख्या पश्चिमी देशांना फक्त व्लादिमीर पुतिन हेच जशास तसे उत्तर देऊ शकतात.  फेब्रुवारी महिन्यात एक सर्वे करण्यात आला होता. या सर्वेत 75 टक्के लोकांना पुतिन यांनाच मतदान करणार असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment