नवी दिल्ली : रशियातील कोरोना विषाणूचे थैमान थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस व्हायरसच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्हायरसमुळे देश एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. रशियामध्ये गेल्या 24 तासांत 49,513 नवीन कोरोना विषाणूची प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. यासह, देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 10,987,774 वर पोहोचली आहे.
रशियामध्ये जितक्या वेगाने रुग्ण वाढत आहेत तितक्याच वेगाने मृत्यूंची संख्याही वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 692 लोकांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 3,24,752 वर पोहोचली आहे, तर एका दिवसात 24,719 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. यासह, कोरोनामधून बरे झालेल्या लोकांची संख्या 9,975,052 झाली आहे. रशियातील सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असलेल्या मॉस्कोमध्ये कोरोनाचे 15,987 नवीन रुग्ण आढळून आले असून, एकूण संख्या 2,140,914 वर पोहोचली आहे.
शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आधीच्या कोरोना लाटांच्या दरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अनुभव यावेळीही मदत करेल. देशातील स्पुतनिक ही कोरोना प्रतिबंधक लस नजीकच्या भविष्यात जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजूर केली जाईल, कारण ती वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन प्रकाराविरूद्ध प्रभावी असल्याचे दिसून आले आहे, असे क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
दरम्यान,अमेरिकेत दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्या आहेत. जागतिक महासत्ता असलेला हा देश सध्या कोरोनाने प्रचंड हैराण झाला आहे. या व्यतिरिक्त जगातील अन्य देशांनाही कोरोना त्रासदायक ठरत आहे. युरोपातील अनेक देश या आजाराने हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून मात्र येथे कोरोनाचा वेग थोडा कमी झाला आहे. मात्र, धोका अजूनही कायम आहे. कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येत आहेत.
चीनमध्येही कोरोनाने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात कठोर प्रतिबंध याच देशात आहेत. येथे कोरोना रुग्णांची संख्या अद्याप जास्त नाही. तरी देखील सरकारने निर्बंध अत्यंत कठोर केले आहेत. चीनमधील बीजिंग शहरात पुढील महिन्यात हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. मात्र, त्याआधी येथे कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना रोखण्यासाठी चीनने अत्यंत कठोर निर्णय घेतले आहेत. स्पर्धा सुरू होण्याआधी येथे कोरोना नियंत्रणात राहिल यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे.
कोरोनाने दिला जोरदार झटका, आणि पाकिस्तानने ‘तो’ निर्णयच फिरवला; पहा, देशात काय होणार बंद..?