Russia Ukraine War : युक्रेन युद्धानंतर रशियाने ब्रिटनमधील (Britain) अनेकांना काळ्या यादीत टाकले आहे. सोमवारी, त्यांनी अशा आणखी 39 लोकांची यादी जारी केली आहे, ज्यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून (David Cameron) यांच्या नावाचा समावेश आहे. रशियाने कामगार नेते केयर स्टारमर आणि माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यासह 39 ब्रिटिश नागरिकांना काळ्या यादीत (Black List) टाकल्याचे सांगितले.

24 फेब्रुवारी रोजी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यानंतर ब्रिटन हा युक्रेनचा समर्थक म्हणून पुढे आला आहे. ब्रिटननेही युक्रेनला आर्थिक आणि लष्करी मदत पाठवली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पत्रकारांसह काळ्या यादीत टाकलेले लोक आपल्या देशाला एकटे पाडण्याच्या उद्देशाने ब्रिटनच्या शत्रुत्वाच्या हालचालींना हातभार लावतात.

युक्रेनमध्ये (Ukraine) लष्करी कारवाई सुरू झाल्यापासून रशियाने अनेक ब्रिटिश नागरिकांना रशियामध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यापैकी बहुतांश राजकारणी आणि पत्रकार आहेत. नवीन सदस्यांमध्ये अनेक खासदार, स्कॉटिश राजकारणी आणि हाउस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य समाविष्ट आहेत. या प्रकारांमुळे आता रशिया आणि ब्रिटेन या देशांतील शत्रुत्वही वाढीस लागले आहे. रशियानेही युक्रेनची मदत करणाऱ्या देशांविरोधात कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

युरोपातील देश रशियाच्या रडारवर आले आहेत. कारण यातील बहुतांश देश नाटो आघाडीत सहभागी आहेत. तसेच अमेरिकेच्या दबावाखाली काम करतात. त्यामुळे रशियालाही त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आता रशियानेही या देशांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटेनच्या लोकांना आपल्या देशात येण्यास बंदी टाकली आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version