Russia And Ukraine War : काही वेळापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे आता पुन्हा एकदा रशिया युक्रेन युद्ध चर्चेत आहे.
युक्रेनला या हल्ल्याची किंमत मोजावी लागणार असा इशारा रशियाने दिला आहे.
या हल्ल्यानंतर पुतिन यांनी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुतिन यांनी युक्रेनवरील हल्ल्याला चोख उत्तर देण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून आता ते त्यांच्या घरात बांधलेल्या बंकरमधून सर्व कामे करणार असल्याचीही बातमी समोर आली आहे.
मॉस्कोमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर रशिया अधिक आक्रमक झाला आहे. रशिया आता युक्रेनवर अधिक ताकदीने हल्ला करेल, असे मानले जात आहे. रशिया आता थेट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना लक्ष्य करू शकतो, अशीही बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या संसदेने युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कीवमधील झेलेन्स्की यांच्या घरावर क्षेपणास्त्र डागण्यात यावे, असे संसदेने म्हटले आहे.
मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर रशियात आणखी एक मोठा हल्ला झाला आहे. हा हल्ला रशियातील तेल डेपोवर करण्यात आला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशियाने या हल्ल्यांमागे युक्रेनचा हात असल्याचे सांगितले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मॉस्को येथील कार्यालयावर झालेल्या हल्ल्यामुळे रशिया संतप्त झाला आहे. या हल्ल्यासाठी रशियाने युक्रेनला जबाबदार धरले आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला जाईल आणि संपूर्ण जग बघेल असे रशियाने म्हटले आहे.