मुंबई / अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील खारे कर्जुने (ता. नगर) या गावातील महा आवास अभियान 2020-21 अन्तर्गत राज्य पुरस्कृत आवास योजनामध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सरपंच प्रभाकर मगर, उपसरपंच अंकुश शेळके (पाटील), ग्रामसेविका प्रियांका जाधव-भोर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी या गावातील भटक्या-विमुक्त आणि गरीब नागरिकांना हक्काचे घर देण्याचा गृहप्रकल्प उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता. (Khare karjune village housing scheme of maha avas and pradhanmantri awas yojana scheme)

यासह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या कार्यालयाने या प्रकल्पाच्या पूर्तता आणि अर्थसाह्यासाठी मोठे काम केल्याचे हे यश असल्याचे गावातील नागरिकांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सदरच्या प्रकल्पाच्या कामासाठी सरकारी राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाल्याने तालुक्यासह राज्यभरातून या गावाचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे. महा आवास अभियान 2020-21 अन्तर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर सर्वोत्कृष्ट ठरले आहे. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनामध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हा व्दितीय क्रमांक आणि  वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट जिल्हे ठरले आहेत. गोंदिया जिल्ह्याने सर्वात जास्त उपक्रमामध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान संपादन केला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान 2020-1 चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली आहेत. हे पुरस्कार वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रमुख उपस्थित करण्याचे नियोजित असून पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Share.

Leave A Reply

Exit mobile version