Rules Changing : आर्थिक वर्ष संपायला अवघे ३ दिवस उरले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की आगामी १ एप्रिल (१ एप्रिल २०२३) तुमच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल घडवून (Rules C) आणणार आहे. त्यामुळे तुमच्या खिशावरही थेट परिणाम होणार आहे. पॅनशी आधार लिंक करण्यासह एकूण 5 मोठे बदल आहेत. ज्यांच्याशी तुमचा थेट संबंध आहे. 1 एप्रिल रोजी होणार्या या आर्थिक संबंधित बदलांबद्दल आधिक माहिती जाणून घेऊ या..
कार देणार खिशाला झटका
कार कंपन्यांच्या मते स्टेज 2 भारतात लागू झाल्यानंतर टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, मर्सिडीज-बेंझ, टोयोटा इत्यादी प्रमुख कार निर्मात्या कंपन्यांच्या किमती वाढणार आहेत. सर्व कार उत्पादक कंपन्यांनी 1 एप्रिलपासून कारच्या किमतीत बदल करण्याबाबत म्हटले होते. ज्यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की तीन दिवसांनी कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीला जास्त पैसे द्यावे लागतील.
- Loksabha Election 2024: राज्यात होणार भाजपचा पराभव? राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन तयार, वाचा सविस्तर
- 7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, खात्यात जमा होणार 48,000 रुपये; वाचा सविस्तर
- Egg Benefits : काय सांगतात, ‘या’ वेळी रोज अंडी खाल्ल्यास मानसिक तणाव होतो दूर, जाणुन घ्या कसं
- Relationship Tips: रिलेशनशिप येणार बदल, फक्त करा ‘हे’ 5 काम; होणार फायदा
- Gold Price Today: सोनं विकलं जातंय स्वस्त, खरेदीसाठी जमली गर्दी; जाणुन घ्या नवीन दर
बँकाही सेवाशुल्क वाढवणार
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पॉलिसी अंतर्गत आता ग्राहकांना हॉलमार्कशिवाय जुने दागिने विकता येणार आहेत. तसेच, बजेट 2023 नुसार, 1 एप्रिल 2023 नंतर, वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेली विमा योजना आता करपात्र असेल. त्याच वेळी अनेक बँका 1 एप्रिलपासून त्यांचे सेवा शुल्क देखील वाढवणार आहेत. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. सेवाशुल्क किती वाढणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
नोंदणी बंधनकारक
आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवले तर १ एप्रिलपासून सर्व खातेधारकांना डीमॅट खात्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असेल. कोणताही खातेदार जो नियमांचे पालन करणार नाही. अशी खाती गोठवण्याची योजना आहे. यासोबतच कोणत्याही डिमॅट खात्यात नॉमिनी जोडणेही बंधनकारक करण्यात आले आहे. सेबीने म्हटले आहे की, ज्या खातेदाराने नियमांचे पालन केले नाही. अशी खाती चिन्हांकित आणि निष्क्रिय केली जातील.
इंधनाचे दर बदलणार
दर महिन्याच्या 1 तारखेला सर्व तेल कंपन्या आणि गॅस कंपन्या त्यांचे दर बदलतात. घरगुती सिलिंडरच्या किमतीत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आताच काही बोलणे योग्य होणार नाही.