Rules Change : सर्वसामान्यांच्या खिशावर येणार आर्थिक ताण, 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ नियम

Rules Change : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक बदल होत असतात. ज्याचा थेट आपल्या खिशावर परिणाम होतो. 1 एप्रिलपासून देखील फास्टॅग, एसबीआय क्रेडिट कार्डपासून अनेक बदल होणार आहेत.

SBI क्रेडिट कार्ड

1 एप्रिल 2024 पासून SBI क्रेडिट कार्ड नियमांमध्ये अनेक मोठे बदल करत असून जर तुम्ही १ एप्रिलपासून भाडे भरले तर तुम्हाला कोणताही रिवॉर्ड पॉइंट दिला जाणार नाही. हा नियम काही क्रेडिट कार्डवर 1 एप्रिलपासून लागू होणार आहे तर काही क्रेडिट कार्डांवर हा नियम 15 एप्रिलपासून लागू होईल.

एलपीजी गॅस

देशभरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित करण्यात येतात. प्रत्येक महिन्याप्रमाणेच एलपीजी सिलिंडरच्या किमती 1 एप्रिल रोजी सुधारण्यात येतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी त्यात कोणताही बदल करण्यास वाव नाही.

FASTag

1 एप्रिलपासून फास्टॅगशी संबंधित एक मोठा बदल होणार असून समजा तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगचे केवायसी बँकेकडून अपडेट केले नसल्यास तुम्हाला 1 एप्रिलपासून समस्यांना सामोरे जावे लागेल. तुम्ही तुमचे फास्टॅग केवायसी केले नसेल तर ते आजच करा. कारण ३१ मार्चनंतर बँका केवायसीशिवाय फास्टॅग निष्क्रिय करतील किंवा ब्लॅकलिस्ट करतील. यानंतर फास्टॅगमध्ये शिल्लक असून पेमेंट केले जाणार नाही. तुम्हाला टोलवर दुप्पट टोल टॅक्स भरावा लागणार आहे.

एनपीएस प्रणाली

नवीन आर्थिक वर्षात NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये बदल होणार असून एप्रिल महिन्यापासून पेन्शन फंड रेग्युलेटर म्हणजेच PFRDA ने नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सध्याच्या लॉगिन प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियम 1 एप्रिल पासून लागू होणार असून नियमानुसार, NPS खात्यात लॉग इन करण्यासाठी दोन पडताळणी म्हणजेच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन गरजेचे असेल. NPS सदस्यांना आधार पडताळणी आणि मोबाईलवर प्राप्त OTP द्वारे लॉग इन करावे लागणार आहे.

आधारशी पॅन लिंक

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 असून यानंतरही, जर कोणी नियमांचे पालन केले नाही, म्हणजे आधारशी पॅन लिंक केले नाही, तर त्याचा पॅन क्रमांक रद्द करण्यात येईल. पॅन कार्ड रद्द करणे म्हणजे तुम्ही बँक खाते चालू करू शकणार नाही किंवा कोणतेही मोठे व्यवहार करू शकणार नाही. पॅन सक्रिय करण्यासाठी उशीरा पेमेंट म्हणून तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.

Leave a Comment