Rule change : ग्राहकांच्या खिशाला कात्री! पुढच्या महिन्यात होणार ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या

Rule change : 1 जूनपासून एलपीजी गॅस सिलिंडर आणि बँकांसह अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. हे बदल कोणते आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत होणार मोठा बदल

हे लक्षात घ्या की देशात दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल होतो. एलपीजी सिलिंडरची किंमत ऑइल मार्केटिंग कंपन्या ठरवत असतात. 14 किलोच्या घरगुती आणि 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कंपन्या ठरवत असून तसेच सीएनजी आणि पीएनजीचे दरही ठरवले जातात. १ जून रोजी गॅसच्या दरात बदल होऊ शकतो. तेल विपणन कंपन्या १ जून रोजी गॅस सिलिंडरचे दर ठरवतील.

ऑनलाइन आधार कार्ड अपडेट

UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 जूनपर्यंत वाढवली असून यामुळे आता आधार धारक सहजपणे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करू शकतात. तथापि, जर तुम्ही ऑफलाइन अपडेट म्हणजेच आधार केंद्रावर गेला तर तुम्हाला प्रति अपडेट 50 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

..तर घेणार मोठा दंड

देशात वाहन चालवण्याचे वय १८ वर्षे आहे. 18 वर्षांखालील अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविले तर त्याला मोठा दंड आकारला जाईल. अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवताना सापडली तर त्याला 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे. इतकेच नाही तर अल्पवयीन व्यक्तीला वयाच्या 25 वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही.

वाहतूक नियमांमध्ये होणार मोठे बदल

1 जूनपासून देशात वाहतूक नियमांमध्येही बदल होणार असून ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम जूनपासून लागू होणार आहेत. समजा कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला मोठा दंड भरावा लागणार आहे.

Leave a Comment