अहमदनगर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खाजगी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा नगर जिल्ह्यातील जवळपास 400 शाळा (School) पात्र ठरल्या आहेत. या शाळांतील एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के म्हणजे 3058 जागांवर मोफत प्रवेश (Free Admission) देण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 2924 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रवेश घेण्यासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत जिल्ह्यातील 1778 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अजूनही 1139 जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने आणखी काही दिवस मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.
याआधी प्रवेश घेण्यासाठी आधी 20 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. मात्र या मुदतीत निम्मे सुद्धा प्रवेश झाले नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. त्यानुसार आता या वाढीव मुदतीत 1778 विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. याआधी शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात 2924 विद्यार्थ्यांची निवड केली होती. शाळा प्रवेशासाठी पालकांना एसएमएस पाठवले होते. प्रवेशासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीत निम्मेही प्रवेश घेतले गेले नाहीत. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी आणखी मुदत मिळावी, अशी मागणी पालक वर्गातून केली जात होती. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेला 29 एप्रिलपर्यंत वाढीव मुदत देण्यात आली. या मुदतीत काही जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागी प्रवेश मिळणे महत्वाचे आहे. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळेल असे सांगण्यात येत आहे. यावर आता शिक्षण विभाग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सध्या जिल्ह्यात प्रवेशासाठी एकूण 400 शाळा पात्र ठरल्या आहेत. या शाळेत एकूण 3058 जागांवर आरटीईअंतर्गत प्रवेश होणार आहेत. यासाठी एकूण प्राप्त 6923 अर्ज मिळाले होती. त्यातील 2924 विद्यार्थ्यांची निवड शिक्षण विभागाने केली आहे. त्यापैकी 1778 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये अकोले 83, जामखेड 36, कर्जत 75, कोपरगाव 91, नगर मनपा 143, नगर 144, नेवासा 148, पारनेर 100, पाथर्डी 74, राहाता 252, राहुरी 122, संगमनेर 198, शेवगाव 132, श्रीगोंदा 55 आणि श्रीरामपूर तालुक्यातील 125 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
RTE शाळा प्रवेशासाठी मुदतवाढ.. जाणून घ्या, आता कधीपर्यंत घेता येईल शाळेत प्रवेश..
RTE शाळाप्रवेशाला सुरुवात; पहा अहमदनगर जिल्ह्यात कशा पद्धतीने राबवली जात आहे प्रवेशप्रक्रिया