Rs 2000 Note : RBI च्या सहा दिवसीय पतधोरण आढावा बैठकीचा निर्णय आज RBI गव्हर्नर यांनी जाहीर केला. या घोषणेमध्ये रेपो दर (Repo Rate) पुन्हा स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय महागाई (Inflation) आणि जीडीपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने बँकिंग व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने बुलेट रिपेमेंट स्कीम अंतर्गत बँकांसाठी सुवर्ण कर्ज मर्यादा वाढवली आहे.
87 टक्के लोकांनी 2,000 रुपये परत केले
रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी शुक्रवारी सांगितले की आतापर्यंत 2000 रुपयांच्या 87 टक्के नोटा चलनातून परत आल्या आहेत मात्र 12,000 कोटी रुपये अद्याप परत आलेले नाहीत. गेल्या शनिवारी आरबीआयने म्हटले होते की 29 सप्टेंबरपर्यंत 3.42 लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. मध्यवर्ती बँकेनेही नोटा परत करण्याची मुदत एका आठवड्याने वाढवली होती. या वर्षी मे महिन्यात 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बाजारातील इतर नोटांच्या तुलनेत 2000 रुपयांच्या नोटांचे चलन कमी असल्याने बँकेने हा निर्णय घेतला.
बुलेट रिपेमेंट अंतर्गत गोल्ड लोन मर्यादेत वाढ
भारतीय रिजर्व्ह बँकेने शुक्रवारी नागरी सहकारी बँकांसाठी बुलेट परतफेड योजनेंतर्गत सुवर्ण कर्ज (Gold Loan) मर्यादा दुप्पट करून 4 लाख रुपये करण्याची घोषणा केली. यापूर्वी त्याची मर्यादा 2 लाख रुपये होती. बुलेट परतफेड योजना म्हणजे कर्जदार कर्ज कालावधीत परतफेडीची चिंता न करता शेवटी व्याज आणि मूळ रक्कम परतफेड करतो.
बुलेट परतफेड योजना काय आहे
बुलेट रिपेमेंट प्लॅन अंतर्गत कर्जदाराकडे मूळ रक्कम आणि व्याज परतफेड करण्यासाठी एक कालावधी असतो. या कालावधीच्या शेवटी कर्जाची एकरकमी परतफेड केली जाऊ शकते. यामध्ये सोन्यावरील कर्जावर व्याज मोजले जाते. या प्रकारच्या परतफेडीला बुलेट परतफेड योजना म्हणतात.