RRB Recruitment 2024 : रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी! ‘या’ तारखेपासून 9 हजार तंत्रज्ञ पदांसाठी करता येणार अर्ज

RRB Recruitment 2024 : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण रेल्वेमध्ये तब्बल 9 हजार तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.

दरम्यान, RRB तंत्रज्ञ भरती अंतर्गत या रिक्त पदांसाठी अर्ज अजून सुरू झालेले नाहीत. विविध अहवालांनुसार, अर्ज 9 मार्च 2024 पासून सुरू होतील आणि या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 असेल. साधारणपणे, नोंदणी सुमारे एक महिना सुरू राहणार आहे आणि या दरम्यान उमेदवाराने विहित नमुन्यात फॉर्म भरावा. सविस्तर अर्ज ९ मार्चपासून पाहता येईल.

जाणून घ्या रिक्त जागा तपशील

या भरती प्रक्रियेतून एकूण 9000 पदे भरली जाणार असून यापैकी 1100 पदे टेक्निशियन ग्रेड I सिग्नलची आहेत. 7900 पदे टेक्निशियन ग्रेड III सिग्नलची असून या भरतींचा तपशील 9 मार्च रोजी प्रसिद्ध झाल्यानंतरच अचूक माहिती देता येणार आहे. नवीनतम माहितीसाठी उमेदवारांना वेळोवेळी अधिकृत वेबसाइट – recruitmentrrb.in ला भेट द्यावी लागेल.

कोणाला करता येईल अर्ज

अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक, एसएसएलसी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील नोंदणीकृत NSVT/SCVT संस्थेचे ITI प्रमाणपत्र असावे. ग्रेड वन सिग्नल टेक्निशियन पदासाठी वयोमर्यादा 18 ते 36 वर्षे आहे. ग्रेड III तंत्रज्ञ पदासाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे इतकी आहे.

किती असेल फी?

अर्ज करण्यासाठी, SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला, ट्रान्सजेंडर, EWS उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. उरलेल्या उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क आहे. नवीनतम माहितीसाठी वेळोवेळी वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जर तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.

Leave a Comment