RPF recruitment । 10वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे सुरक्षा दलात नोकरीची उत्तम संधी! जाणून घ्या सर्व काही

RPF recruitment । जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुमच्याकडे आता रेल्वे सुरक्षा दलात नोकरीची उत्तम संधी आहे. RPF मध्ये कॉन्स्टेबल आणि SI च्या पदांवर भरती होणार असून याबाबत अधिसूचना जारी झाली आहे.

एकूण पदांमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलच्या ४२०८ आणि उपनिरीक्षकाच्या ४५२ पदांचा समावेश असून या पदांसाठी मागितलेली पात्रता काय आहे, अर्जाचे वय काय असावे आणि निवड कशी करण्यात येईल, ते जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

पात्रता निकष

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर उमेदवाराला उपनिरीक्षक पदांसाठी अर्ज करता येईल. तसेच हवालदार पदांसाठी अर्जदाराने दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा- RPF SI पदांसाठी, वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. आरपीएफ कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे दरम्यान असावे.

असा करा अर्ज

  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट आरपीएफ. indianrailways.gov.in वर जावे लागेल.
  • आता होम पेजवर RPF भरती 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
  • तुम्हाला एक नवीन लॉगिन विंडो पाहायला मिळेल.
  • पुढे मेल आयडी, फोन नंबर इत्यादी टाकून नोंदणी करा.
  • सर्वात शेवटी सर्व तपशील प्रविष्ट करून अर्ज फी सबमिट करा.

अशी करा निवड

निवड तीन टप्प्यात करण्यात येईल. संगणक आधारित चाचणी (CBT), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), आणि भौतिक मापन चाचणी (PMT) आणि पडताळणी. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येक प्रश्नाच्या एकूण गुणांपैकी एक तृतीयांश गुण वजा करण्यात येईल.

कॉन्स्टेबल पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला 21,700 रुपये पगार मिळेल आणि उपनिरीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला 35,400 रुपये प्रति महिना वेतन मिळेल. या भरतीशी निगडित अधिक माहितीसाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना पाहावी लागेल.

Leave a Comment