Royal Enfield : हॉलीवूड स्टाइल आणि 648cc हाय पॉवर रॉयल एनफिल्डची बाईक, खरेदीसाठी तरुणांची मोठी गर्दी

Royal Enfield : रॉयल एनफिल्ड अनेक वर्षांपासून तरुणाईच्या मनावर राज्य करत आहे. कंपनी सतत आपल्या शानदार फीचर्स असणाऱ्या बाईक लाँच करत असते. जी कंपन्यांना देखील टक्कर देत असते. कंपनीची अशीच एक हॉलीवूड स्टाइल बाइक आहे जी 648cc हाय पॉवरसह येते.

शॉटगन 650 च्या सीटची उंची आणि इंधन टाकी

कंपनीच्या या स्टायलिश बाईकच्या पुढील बाजूस 18 इंच टायर आणि मागील बाजूस 17 इंच चाकाचा आकार पाहायला मिळेल. शॉटगन 650 च्या सीटची उंची 795 मिमी मध्यम आकारात ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे ती चालवणे सोपे होते. या बाइकमध्ये 13.8 लीटरची इंधन टाकी आहे, जी लांबच्या राइडमध्ये खूप फायदेशीर आहे.

मिळतील 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन

कंपनीचा दावा आहे की ही बाईक रस्त्यावर 22 kmpl मायलेज देत असून Royal Enfield Shotgun 650 ला 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. ही जबरदस्त वजनाची बाईक आहे, ज्याचे वजन 240 किलो इतके आहे. किमतीचा विचार केला तर या बाइकचे टॉप मॉडेल 4.25 लाख रुपये ऑन-रोड आहे. यामध्ये 3 रंग पर्याय आणि 4 प्रकार उपलब्ध आहेत.

अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि डिस्क ब्रेक

बाइकला अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि समोर आणि मागील दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक पाहायला मिळतात. हे डिस्क ब्रेक रायडरला मजबूत पकड देते आणि ABS उच्च गतीवर नियंत्रण देते. या आकर्षक बाईकमध्ये ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे विशेषतः लांब मार्गांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे इंजिन लांब पल्ल्याच्या प्रवासात उच्च कार्यक्षमता देत असून ते लवकर गरम होत नाही.

Leave a Comment