Royal Enfield Guerrilla 450 : कारसारखी पॉवर असणारी Guerrilla 450 पुढील महिन्यात लॉन्च होणार आहे. या नवीन बाईकमध्ये तुम्हाला शानदार फीचर्स आणि उत्तम मायलेज असणार आहे. अनेकजण या बाइकची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Royal Enfield Guerrilla 450 चे डिझाईन
रॉयल एनफिल्ड च्या नवीन बाईक Guerrilla 450 चे डिझाईन हंटर 350 सारखे असणार आहे. कंपनीच्या या नवीन बाईकमध्ये अनेक फीचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. या जबरदस्त बाईकचे डिझाइन कॉम्पॅक्ट असण्याची शक्यता आहे. Guerrilla 450 नेमप्लेटसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. हे लक्षात घ्या की कंपनी पुढील महिन्यात ही बाईक लाँच करणार आहे.
इंजिन आणि पॉवर
या नवीन मॉडेलमध्ये इंजिन ही सर्वात खास गोष्ट असणार असून नवीन Guerrilla 450 मध्ये 452cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर DOHC इंजिन मिळेल. जे 40.02 PS आणि 40Nm टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 6 स्पीड ट्रान्समिशनने सुसज्ज असणार आहे. किमतीचा विचार केला तर आता या बाईकला मिळणाऱ्या पॉवरनुसार या बाईकची संभाव्य किंमत 2.50 लाख रुपये एक्स-शोरूम असेल.
कंपनीच्या नवीन Guerrilla 450 मध्ये कंपनी अनेक नवीन फीचर्स समाविष्ट करेल. रायडर्सच्या सोयीसाठी, बाइकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन, राइड मोड, साइड-माउंटेड एक्झॉस्ट यांसारखी अप्रतिम फीचर्स मिळू शकतात. याशिवाय, बाइकमध्ये राइड-बाय-वायर थ्रॉटलसह TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची सुविधा देखील असणार आहे.
सुरक्षेसाठी, बाईकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक आणि ड्युअल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देखील दिले जाईल. चांगल्या राइडसाठी, बाइकला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक युनिट मिळेल. ही बाईक KTM 390 Duke शी टक्कर देऊ शकते. या नवीन मॉडेलद्वारे कंपनी 500cc बाइक सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करेल.