मुंबई- भारताने बंगळुरू येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा (IND vs SL) 238 धावांनी पराभव करत मालिका 2-0 ने जिंकली. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाहुण्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी, भारताने पाहुण्यांना 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. विजयासाठी 447 धावांचे लक्ष्य असलेल्या श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 208 धावांत गारद झाला.
या मालिकेत भारतीय संघाला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋषभ पंतसारखे (Rishab pant) सकारात्मक फॉर्म मिळाले, पण ही मालिका अशा खेळाडूसाठीही लक्षात राहील, जो आता उंचीच्या शिखराकडे वेगाने पावले टाकत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये शंभर बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेल्या रविचंद्रन अश्विनचे (Ravichandran Ashwin) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कौतुक केले.
रविचंद्रन अश्विनबद्दल तो म्हणाला की जेव्हाही आम्ही त्याला चेंडू देतो तेव्हा तो सामना जिंकून देणारी कामगिरी करतो. तो निश्चितच सर्वकालीन महान आहे यात शंका नाही. रोहित शर्मा जेव्हा त्याच्याबद्दल बोलत होता तेव्हा अश्विन डोकं टेकवून उभा होता आणि त्यावेळी तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि भावूक झाला हे स्पष्ट होतं.
खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा
रोहित म्हणाला की, त्याच्याकडे अजून दीर्घ कारकीर्द बाकी आहे आणि तो अशीच कामगिरी करत राहील याची आम्हाला खात्री आहे. आम्हाला गुलाबी चेंडूने कसोटी खेळण्याची सवय लागली आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीने ते अधिक खास झाले.
अश्विनच्या गोलंदाजी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत बाजी मारली आहे.
एकदिवसीय – 113 सामन्यात 151 विकेट
कसोटी – 86 सामन्यात 442 विकेट
T20 – 51 सामन्यात 61 विकेट्स
आयपीएल – 167 सामन्यात 145 विकेट
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने शतक झळकावले पण त्याचा संघ हरला. करुणारत्ने म्हणाला की आम्ही सामना जिंकला असता तर मला आनंद झाला असता. मला माहित आहे की आमचा संघ चांगला आहे पण आम्ही चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करू शकलो नाही. गोलंदाजीतही आम्ही खूप ढिले चेंडू टाकले.