Rohit Sharma With Drushil Chauhan: मुंबई (Mumbai): एखाद्या जगप्रसिद्ध क्रिकेटपटुला आपल्या गोलंदाजीने प्रभावित करणारा एक अवलिया आता ट्रेंडमध्ये आहे. होय, त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Indian captain Rohit Sharma) यालाही जेरीस आणले आहे. आणि तो आहे फक्त 9 वर्षांचा. होय, पर्थमध्ये नेट सराव करताना या 9 वर्षीय चिमूरड्याने म्हणजे द्रुशील चौहानने भारतीय कर्णधार रोहित शर्माला प्रभावित केले आहे. यासोबतच त्याने टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Team India coach Rahul Dravid) यांचीही भेट घेतली आहे.
- हेही वाचा :
- ICC T20 world cup Bhuvneshwar Kumar: ‘अशी’ असेल भारताची पुढील सामन्याची रणनीती; कारण…
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- Modi Government: अनेकांना धक्का..! आता ‘या’ मोठ्या बँकेतील हिस्सेदारी विकणार सरकार
- Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Live : भारत जोडो यात्रेचा ‘असा’ही फायदा; राहुलना मिळाला ‘त्या’ नेत्यांची मदत
द्रुशील चौहान हा पर्थच्या गल्ल्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. द्रुशील चौहानने नुकतीच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतल्यावर त्याने भारतीय कर्णधाराला नेटमध्ये गोलंदाजी केली. पर्थमधील क्रिकेट खेळणाऱ्या चांगल्या 100 मुलांपैकी एक द्रुशील चौहान हा एक आहे. द्रुशील चौहानला भारतीय संघाने नेट सरावासाठी बोलावले होते. द्रुशील चौहान हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून त्याला आगामी काळात अष्टपैलू खेळाडू बनायचे आहे. या खेळाडूने नेट प्रॅक्टिस दरम्यान रोहित शर्माला इनस्विंगर आणि आऊटस्विंगर बॉल टाकले. तसेच सराव सत्र संपल्यानंतर रोहित शर्मा द्रुशील चौहानसोबत ड्रेसिंग रूममध्येही गेला. भारतीय कर्णधाराने त्याची ओळख प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांशी करून दिली. याबद्दल द्रुशील चौहानचे वडील मेहुल चौहान सांगतात की, द्रुशीलमध्ये नैसर्गिक प्रतिभा आहे. तो क्रिकेटच्या प्रेमात आहे, द्रुशीलचे या खेळाप्रती असलेले समर्पण वाखाणण्याजोगे आहे.
Onion Price : ‘या’ बाजार समितीत कांद्याच्या भावात वाढ; पहा, कांद्याला किती मिळतोय भाव ? https://t.co/KZFlqlfuVn
— Krushirang (@krushirang) October 28, 2022
द्रुशील चौहानने सांगितले की, नेट सरावानंतर रोहित शर्माने माझे कौतुक केले. आम्ही माझी पार्श्वभूमी आणि क्रिकेटशी संबंधित गोष्टींवर चर्चा केली. मला आनंद आहे की मी भारतीय कर्णधाराशी संवाद साधू शकलो, मला रोहित शर्माबद्दल खूप आदर आहे. त्याचवेळी द्रुशील म्हणाला की, भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही माझ्या गोलंदाजी कौशल्याचे कौतुक केले. द्रुशील चौहान म्हणतो की, त्याला भविष्यात क्रिकेटर बनायचे आहे. द्रुशील चौहानचे वडील मेहुल चौहान सांगतात की ते आपल्या मुलाला 1983 च्या विश्वचषकाचे व्हिडिओ दाखवतात, त्यामुळे द्रुशीलचे क्रिकेटमधील समर्पण आणखी वाढते. त्याचबरोबर आगामी काळात मुलाने महान अष्टपैलू व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. (Bowling like Kapil while dreaming to be a batsman like Rohit)