Rohit Sharma : 2011 चा विश्वचषक कोण विसरू शकेल? महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Team India) अप्रतिम कामगिरी करत दुसऱ्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. या संघात एकापेक्षा जास्त बलवान खेळाडूंचा समावेश होता, पण सध्याचा संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) २०११ च्या विश्वचषक (World Cup) संघात घेतले नव्हते.
अलीकडेच युजवेंद्र चहलला आशिया चषक संघात (Asia Cup2023) संधी न दिल्याने त्याची सातत्याने चर्चा होत आहे. 2011 मध्येही असाच प्रकार घडला होता जेव्हा रोहितला संधी देण्यात आली नव्हती. तब्बल 12 वर्षांनंतर माजी सिलेक्टर राजा वेंकट यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की रोहित शर्माला संधी का मिळाली नाही?
2011 च्या विश्वचषक संघात रोहित शर्माचा समावेश का करण्यात आला नाही हे राजा वेंकटने (Raja Venkat) सांगितले. खरं तर, कृष्णमाचारी श्रीकांतच्या नेतृत्वाखालील निवड समितीचा भाग असलेल्या राजा वेंकटने सांगितले की, रोहित शर्माला एमएस धोनीमुळे 2011 च्या विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही. RevSports वर बोलताना वेकंट म्हणाले की 2011 च्या विश्वचषकासाठी संघ निवडताना रोहित शर्मा आमच्या योजनेचा एक भाग होता.
मी आणि यशपाल शर्मा भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होतो आणि इतर तीन निवडक श्रीकांत, सुरेंद्र भावे आणि नरेंद्र हिरवाणी चेन्नईत होतो. जेव्हा आम्ही संघ निवडत होतो, तेव्हा क्रमांक 1 ते 14 पर्यंतचे खेळाडू निवडले जात होते.
पण जेव्हा आम्ही रोहितचे नाव 15 व्या क्रमांकासाठी सुचवले, त्यावेळी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनीही होकार दिला, पण धोनीला पियुष चावलाला (Piyush Chawala) संघात समाविष्ट करायचे होते. अशा परिस्थितीत प्रशिक्षकही त्याच्या समर्थनात आला.
यासोबतच तो पुढे म्हणाला की, आम्हाला त्याच्याशी बोलण्याची संधी मिळाली नाही, पण आम्ही रोहितची निवड करू शकलो नाही म्हणून आम्ही निराश झालो, पण जेव्हा कर्णधार आणि प्रशिक्षक पीयूषला 15 वा खेळाडू बनवायचे होते तेव्हा आम्ही ते मान्य केले. आम्ही निवडलेल्या संघातील 15 खेळाडू योग्य आहेत असे आम्हाला वाटले, पण शेवटी आम्हाला बदल करावा लागला.