Rohit Sharma : विश्वचषक स्पर्धेत काल भारताने बांग्लादेशचा (World Cup 2023) दणदणीत पराभव करत सलग चौथा विजय मिळवला. या सामन्यानंतर आता भारताचा पुढील सामना रविवारी न्यूझीलँडशी होणार आहे. मात्र या सामन्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माबाबत (Rohit Sharma) एक प्रसंग घडला ज्याची जोरदार चर्चा होत आहे. 19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध खेळण्यासाठी मुंबईहून पुण्याला जात असताना रोहित शर्मा दोनदा वेगात गाडी चालवताना आढळला होता. एक्स्प्रेस वेच्या दोन्ही लेनवर बसवण्यात आलेल्या ऑटो कॅमेऱ्यात त्यांची आलिशान कार कैद झाली. वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगात गाडी दोन वेगवेगळ्या वेळा पकडली गेली.
भारताचा (Team India) कर्णधार रोहित शर्माला मुंबईहून पुण्याला जाताना दोन वेळा ओव्हरस्पीडिंग केल्याबद्दल महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलिस अधीक्षकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा प्रकार 17 ऑक्टोबर रोजी घडला असून नियमानुसार कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दंड तत्काळ भरण्यात आला.
हायवे पोलिसांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार रोहितच्या आलिशान कारने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर 105 किमी प्रतितास वेग मर्यादा दोनदा पार केली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ओव्हर स्पीडिंग केल्याबद्दल रोहितला एकूण चार हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
भारताने बांगलादेशचा पराभव केला
रोहितने बांगलादेशविरुद्ध तुफानी इनिंग खेळली होती. शुभमन गिलसोबत झंझावाती सुरुवात करत झटपट 48 धावा केल्या. भारताने 257 धावांचे लक्ष्य 3 गडी गमावून पूर्ण केले. विश्वचषक २०२३ मधील भारताचा हा सलग चौथा विजय आहे.