Rohit Sharma : भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्ध 22 धावा करत एक खास टप्पा गाठला आहे. 36 वर्षीय ‘हिटमॅन’ शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये 10,000 धावा करणारा टीम इंडियाचा (Team India) सहावा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी केवळ पाच फलंदाजांच्या नावावर ही खास कामगिरी नोंदवली गेली होती. ज्यामध्ये माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहली, माजी कर्णधार सौरव गांगुली, विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि 2011 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार एमएस धोनी यांचा समावेश होता.
सचिन तेंडुलकरच्या वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा
भारतासाठी वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विशेष विक्रम’क्रिकेटचा देव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. माजी क्रिकेटपटूने 1989 ते 2012 दरम्यान एकूण 463 एकदिवसीय सामने खेळले. 452 डावांमध्ये 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या. वनडे फॉरमॅटमध्ये सचिनच्या नावावर 49 शतके आणि 96 अर्धशतके आहेत.
वनडे फॉरमॅटमध्ये 10000 चा आकडा पार करणारे भारतीय खेळाडू
सचिन तेंडुलकर – 18426
विराट कोहली – 13024
सौरव गांगुली – 11221
राहुल द्रविड – 10768
एमएस धोनी – 10599
रोहित शर्मा – 10031
वनडे फॉरमॅटमध्ये विराटच्या सर्वात जलद 10000 धावा
वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. किंग कोहलीने 205 डावांमध्ये हा विशेष दर्जा मिळवला आहे. कोहलीनंतर आता रोहित शर्मा आला आहे. रोहितने 241 डावात ही खास कामगिरी केली आहे.
ODI फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करणारे जगातील 5 खेळाडू
विराट कोहली – 205 डाव
रोहित शर्मा – 241 डाव
सचिन तेंडुलकर – 259 डाव
सौरव गांगुली – 263 डाव
रिकी पाँटिंग – 263 डाव