मुंबई – श्रीलंकेविरुद्धच्या (Sri lanka) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) मोठी जबाबदारी होती, जी त्याने उत्तमरीत्या पार पाडली आणि अनुभवाने त्यात आणखी सुधारणा होईल, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सांगितले.
दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने दुसरी कसोटी 238 धावांनी जिंकली. रहाणेच्या जागी आलेल्या अय्यरने दुसऱ्या कसोटीत 92 आणि 67 धावा केल्या. पुजाराच्या जागी हनुमा विहारी तिसऱ्या क्रमांकावर उतरला होता. संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना रोहित म्हणाला की ही चांगली कामगिरी होती आणि मी वैयक्तिकरित्या आणि एक संघ म्हणून त्याचा आनंद लुटला. आम्हाला संघ म्हणून काही गोष्टी साध्य करायच्या होत्या ज्या आम्ही केल्या.
खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा
वैयक्तिक कामगिरीबाबत तो म्हणाला की, रवींद्र जडेजा फलंदाज म्हणून परिपक्व झाला असून तो चमकत आहे. त्याने संघ मजबूत केला आहे आणि गोलंदाज म्हणूनही सुधारणा केली आहे. तो एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणजेच संपूर्ण पॅकेज देखील आहे. तो म्हणाला, श्रेयसने टी-20 मालिकेत फॉर्म कायम ठेवला. रहाणे आणि पुजारा सारख्या खेळाडूंची जागा घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे हे त्याला माहीत होते पण त्याने ते चांगले केले. तो म्हणाला की, ऋषभ प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत आहे. विशेषतः या परिस्थितीत. त्याचे काही झेल आणि यष्टिचीत त्याचा आत्मविश्वास दाखवतात.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये शंभर विकेट घेणारा पहिला गोलंदाज असलेल्या रविचंद्रन अश्विनबद्दल तो म्हणाला की, जेव्हाही आम्ही त्याला चेंडू देतो तेव्हा तो सामना जिंकून देणारी कामगिरी करतो. त्याची अजून प्रदीर्घ कारकीर्द बाकी आहे आणि तो पुढेही करत राहील याची आम्हाला खात्री आहे. आम्हाला गुलाबी चेंडूने कसोटी खेळण्याची सवय लागली आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीने ते अधिक खास झाले.
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने शतक झळकावले पण त्याचा संघ हरला. तो म्हणाला की सामना जिंकला असता तर मला आनंद झाला असता. मला माहित आहे की आमचा संघ चांगला आहे पण आम्ही चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करू शकलो नाही. गोलंदाजीतही आम्ही खूप ढिले चेंडू टाकले.