Road Accident in Rewa: Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील रीवा येथे एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. बस (Bus) आणि ट्रॉली (trolley) यांच्यात झालेल्या धडकेत १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच वेळी, ३० हून अधिक लोक जखमी आहेत, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री १०.३० ते ११.०० च्या दरम्यान घडला. ही बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. दरम्यान, सुहागी परिसरात बस एका ट्रॉलीला धडकली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ते बचावकार्यात गुंतले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), बिहार (Bihar) आणि नेपाळमधील (Nepal) असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी किंचाळ्या, आक्रोश दिसून येत होते. सगळीकडे गोंधळाचे वातावरण होते. जखमींना उपचारासाठी जिल्ह्यातील संजय गांधी रुग्णालयात (Sanjay Gandhi Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्याच वेळी, मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल, टुनथर येथे ठेवण्यात आले आहेत. ही बस डबल डेकर (Double decker bus) असल्याचे सांगण्यात येत आहे.
Madhya Pradesh | 14 dead, 40 injured in a collision between a bus and trolley near Suhagi Hills in Rewa. The bus was going from Hyderabad to Gorakhpur. All people on the bus are reportedly residents of Uttar Pradesh. pic.twitter.com/cwN2MUCB7O
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) October 22, 2022
बसमधील बहुतांश कामगार
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो डोंगराळ भाग (hilly areas) आहे. बसमध्ये बहुतांश कामगार होते, जे दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जात होते. एसपी नवनीत भसीन (SP Navneet Bhasin) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रीवा येथील सुहागी टेकडीजवळ बस आणि ट्रॉली यांच्यात झालेल्या धडकेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी २० जणांना प्रयागराज (Prayagraj) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती.
सोहागी डोंगर परिसरात हा अपघात झाला
हैदराबादच्या सिकंदराबाद (Secunderabad) येथून प्रवाशांना घेऊन बस उत्तर प्रदेशला निघाली होती. बस रेवाच्या सोहागी पर्वतीय भागात पोहोचताच हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये १०० हून अधिक प्रवासी होते. स्थानिक प्रशासन बसच्या मालकाचा शोध घेत आहे. यासोबतच मृतकाच्या घराचा शोध घेण्यात येत असून, त्याची माहिती नातेवाईकांपर्यंत पोहोचवता येईल.