Risk of Cancer : सावधान! तेल वारंवार गरम केले तर वाढतो कर्करोगाचा धोका, कसं ते जाणून घ्या

Risk of Cancer : हल्ली कर्करोगाचा धोका वाढत चालला आहे. अनेकांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागतो. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे तेल वारंवार गरम केले तर कर्करोगाचा धोका वाढत जातो.

ICMR ने भारतीयांसाठी सुधारित आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, यात खाण्याच्या सवयी आणि त्यासंबंधित सवयींबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्वे केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये त्यांनी सांगितले की वनस्पती तेल वारंवार गरम केले तर विषारी संयुगे तयार होतात, यामुळे डार्ट रोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो.

तेल गरम केल्याने होईल कर्करोग?

जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्वयंपाकासाठी भाजीपाला तेलाचा पुनर्वापर करण्याची प्रथा घरे आणि हॉटेल-रेस्टॉरंट या दोन्ही ठिकाणी खुह्प सामान्य आहे. पण यामुळे आरोग्याची चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते. वनस्पती तेल/चरबी वारंवार गरम केले तर पीयूएफएचे ऑक्सिडेशन होते, ज्यामुळे हानिकारक/विषारी संयुगे तयार होतात आणि हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो, असे अहवाल सांगतो.

हृदयासाठी असते खूप वाईट

उच्च तापमानात, तेलातील काही चरबी ट्रान्स फॅट्समध्ये बदलत असतात. ट्रान्स फॅट्स हे हानिकारक चरबी असल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. जेव्हा तेल सतत वापरले जाते त्यावेळी ट्रान्स फॅटचे प्रमाण वाढते. पूर्वीच्या अभ्यासातून हे दिसून आले आहे की स्वयंपाकासाठी तेल पुन्हा गरम केले तर विषारी पदार्थ कसे बाहेर पडतात आणि शरीरातील मुक्त रॅडिकल्स वाढतात. असे झाले तर जळजळ आणि विविध जुनाट आजार होऊ शकतात.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तेल फिल्टर करून उरलेले तेल एक-दोन दिवसांत वापरावे. स्वयंपाक घरांमध्ये एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल गाळून करीमध्ये वापरावे, परंतु तेच तेल तळण्यासाठी पुन्हा वापरणे टाळावे. हे लक्षात घ्या की अशा तेलांचा वापर एक-दोन दिवसांत करावा. असे तेल जास्त काळ टाळावे, कारण असे तेल खराब होण्याची शक्यता जास्त असते.

Leave a Comment