British prime minister rishi sunak: मुंबई (Mumbai): ब्रिटन देशाच्या अर्थात साहेबांच्या देशाच्या प्रमुख पदावर बसण्याचा मान मिळवणाऱ्या ऋषी सुनक यांच्याबाबतच्या न्यूज ट्रेंडमध्ये आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाशी वांशिक नाळ जोडली गेल्याने दोन्ही देशातील लाखो नागरिकांनी त्यांच्यावर आपलाच दावा असल्याचे म्हटले आहे. अशावेळी सुनक हे हिंदू असल्याचे सांगून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी “गट्टी” असल्यागत पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, सुनक हे ब्रिटिश आणि अमेरिकन नागरिकत्व असलेले नेते आहेत आणि त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (India’s Father of the Nation, Mahatma Gandhi) यांच्या विचारांना जीवनात खूप महत्व असल्याचे वेळोवेळी दाखवून दिलेले आहे.

ब्रिटनचे अर्थमंत्री असताना ऋषी सुनक (Britain’s Finance Minister Rishi Sunak) यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन आणि वारशाच्या स्मरणार्थ पाच पौंडांचे विशेष स्मारक नाणे (Mahatma Gandhi Coin) जारी होते. त्यावेळी त्यांनी स्वतःहून लक्ष घालून सोने आणि चांदीसह अनेक मानकांमध्ये उपलब्ध असे विशेष संग्राहक नाणे बनवून घेतले होते. हीना ग्लोव्हर (designed by Heena Glover) यांनी हे डिझाइन केले आहे. त्यात गांधींच्या सर्वात प्रसिद्ध वाक्यापैकी एक “माझे जीवन हा माझा संदेश” (My life is my message) असे कोरलेले आहे. यासोबतच भारताचे राष्ट्रीय फूल कमळाची प्रतिमा कोरण्यात आली आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक त्यावेळी म्हणाले होते की, हे नाणे जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देणार्‍या महात्मा गांधी या प्रभावशाली नेत्याला योग्य श्रद्धांजली आहे. एक हिंदू असल्याने दिवाळीला हे नाणे प्रसिद्ध करताना मला अभिमान वाटत असल्याचे सुनक यांनी सांगितले होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि पहिल्यांदाच ब्रिटिश नाण्याद्वारे त्यांच्या उल्लेखनीय जीवनाची आठवण करणे आश्चर्यकारक असल्याचे त्यावेळी अनेकांना वाटले होते.

Share.

Leave A Reply

Exit mobile version