Rice Roti Rate : खवय्यांच्या खिशाला झटका! शाकाहारी थाळीच्या दरात मोठ्ठी वाढ; फेब्रुवारीचा रिपोर्ट आला

Rice Roti Rate : देशात महागाईत वाढ झाली आहे ही गोष्ट आता कुणी (Inflation) नाकारू शकत नाही. खाद्यपदार्थ आणि (Rice Roti Rate) भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणामही दिसून येत आहे. कांदा आणि टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यात शाकाहारी थाळीच्या किंमतीत सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिसिसने (CRISIL) जारी केलेल्या मासिक दर अहवालात नमूद केले आहे की पोल्ट्रीच्या किंमतीत घट झाल्याने मांसाहारी थाळीच्या किंमतीत नऊ टक्क्यांनी घट झाली आहे.

LPG cylinder : महिला दिनानिमित्त सरकारची मोठी घोषणा, LPG सिलिंडरच्या किमतीत मोठी घसरण

Rice Roti Rate

शाकाहारी थाळीत चपाती, भाजी, भात, डाळ, दही आणि कोशिंबीर यांचा समावेश होते. फेब्रुवारी महिन्यात 27.5 रुपये प्रति प्लेट अशी दरवाढ झाली आहे. याआधी शाकाहारी थाळीचा दर 25.6 रुपये होती. वर्षभराआधी याच काळात मांसाहारी थाळीची किंमत 59.2 रुपये होती. जी 54 रुपयांवर आली. जानेवारी महिन्यात मात्र या थाळीची किंमत 52 रुपये होती. त्यापेक्षा किंमत अजूनही दोन रुपये जास्त आहे. मांसाहारी थाळीच्या एकूण खर्चापैकी 50 टक्के वाटा ब्रॉयलरचा असतो. ब्रॉयलरच्या किंमतीत 20 टक्के घट झाली आहे. त्यामुळे मांसाहारी थाळीचे दर कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

CIBIL Score : गृहकर्ज घेताय? त्यापूर्वी जाणून घ्या CIBIL स्कोर, नाहीतर बसेल आर्थिक फटका

Leave a Comment