Reverse Mortgage Scheme । कोणत्याही कराशिवाय निवृत्तीनंतर SBI देणार घरी बसून पैसे, कसे ते जाणून घ्या

Reverse Mortgage Scheme । आपला वृद्धापकाळ चांगला असावा, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी प्रत्येकजण दिवसरात्र मेहनत करत असतात. काहीजण सरकारी तसेच खासगी योजनामध्ये गुंतवणूक करत असतात. गुंतवणूक जर योग्य ठिकाणी केली तर त्याचा फायदा देखील खूप होतो.

अशातच आता गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. SBI या बँकेने सेवानिवृत्त लोकांसाठी एक खास योजना आणली असून या योजनेअंतर्गत आता म्हातारपणी घरी बसून पैसे मिळतील. इतकेच नाही तर तुम्हाला गुंतवणुकीवर कर भरावा लागणार नाही.

रिव्हर्स मॉर्टगेज योजना

सेवानिवृत्तीसाठी पैसे वाचवू न शकलेल्या वृद्धांना आता सरकारी बँक पैसे देणार असून या योजनेंतर्गत विहित वयानंतरच्या वृद्धांना घरी बसून पैसे देण्यात येते. जेणे करून त्यांचा दैनंदिन खर्च भागवता येईल आणि उपचारही होऊ शकतील. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पैसे परत मागणार नाहीत आणि त्यावर कोणताही कर आकारण्यात येणार नाही.

कशी काम करते ही योजना?

सरकारी बँक SBI ची ही योजना वृद्धांसाठी बनवली असून ज्यामध्ये लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या बदल्यात पैसे देण्यात येते. या योजनेच्या संपूर्ण कालावधीत, मालमत्तेची संपूर्ण मालकी वृद्धांकडे राहील किंवा त्यांना घरातून बाहेर काढले जाणार नाही. यावर कोणताही ईएमआय भरण्याची गरज देखील पडणार नाही.

महत्त्वाच्या गोष्टी

  • हे लक्षात घ्या की, कर्ज घेण्यासाठी वापरलेली मालमत्ता 20 वर्षांपेक्षा जास्त जुनी नसावी.
  • तसेच रिव्हर्स मॉर्टगेज लोन मिळविण्यासाठी, मालमत्ता अर्जदाराच्या नावावर असावी आणि त्यावर कोणतेही कर्ज नसावे.
  • वृद्ध व्यक्ती कमीत कमी 1 वर्षापासून मालमत्तेवर राहत असावी.
  • त्या मालमत्तेवर आधीपासून गृहकर्ज सुरू असेल तर एनओसी द्यावा.
  • आयकराच्या कलम 10(43) अंतर्गत, तारण कर्जाची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.
  • फक्त मालमत्तेच्या आधारावर कर्जाचा निर्णय घ्यावा.
  • हे कर्ज जास्तीत जास्त 15 वर्षांसाठीच आहे.

SBI ची ही योजना 62 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असून पत्नीचे वय किमान ५५ असावे. या योजनेतील पैसे तुम्ही प्रत्येक महिन्याला पगार म्हणून वापरू शकता.

Leave a Comment