Retail Inflation : भाजीपाल्याच्या किंमतीत वाढ झाल्याने फेब्रुवारी (Retail Inflation) महिन्यात एकूण किरकोळ महागाईत घट झाली. याच कारणामुळे किरकोळ महागाईचा दर या वर्षी फेब्रुवारीत 5.09 टक्के होता. याआधी म्हणजे जानेवारी महिन्यात हा दर 5.10 टक्क इतका होता. मागील वर्षातील फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.44 टक्के होता. त्यातुलनेत यावर्षात किरकोळ महागाईत घट झाल्याचे दिसून आले आहे. आरबीआयने किरकोळ चलनवाढीचा दर दोन टक्क्यांच्या फरकासह चार टक्क्यांवर निश्चित केला आहे. यापेक्षा जर जास्त वाढ झाली तर ते नागरिकांना त्रासदायक ठरू शकते.
फेब्रुवारी महिन्यात डाळी आणि भाजीपाल्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे खाद्य पदार्थांची किरकोळ महागाई मागील वर्षातील फेब्रुवारीच्या तुलनेत 8.66 टक्के वाढली आहे. तर यावर्षी जानेवारी महिन्यात 8.30 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात डाळींच्या किंमती 18.90 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचवेळी भाजीपाल्याच्या दरात 30.25 टक्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात खाद्यतेल आणि वनस्पती तेलाच्या किंमतीत 13.97 टक्के आणि इंधनाच्या किमती मात्र 0.77 टक्क्यांनी घसरल्या.
Retail Inflation
मागील महिन्यात बँकेने 2023-24 साठी किरकोळ महागाईचा दर 5.4 टक्के राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. जानेवारी ते मार्च या तिमाहीत महागाई पाच टक्के राहिल असे सांगितले होते. सरकारने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या फेब्रुवारीत धान्याच्या किरकोळ किंमतीत 7.60 टक्के, मसाले 13.51 टक्के, साखर 7.48 टक्के, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ 3.86 टक्के आणि फळांच्या किंमततीत 4.83 टक्क्यांनी वाढ झाली होती. कपड्यांच्या किंमती 3.14 टक्क्यांनी तर वाहतूक दळणवळण सेवा 1.83 टक्के आणि आरोग्य सेवा 4.53 टक्क्यांना महागल्या होत्या.
Retail Inflation
उत्पादन, खोदकाम आणि ऊर्जा क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे जानेवारी 2024 मध्ये भारताचे औद्योगिक उत्पादन वाढ 8.3 टक्क्यांपर्यंत कमी झाली. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या संदर्भात मोजली जाणारी काखाना उत्पादन वाढ जानेवारी 2023 मध्ये 5.8 टक्के होती. डिसेंबर 2023 मध्ये औद्योगिक उत्पादन वाढ 4.2 टक्के होती तर नोव्हेंबर 2023 मध्ये हा आकडा 2.4 टक्के इतका होता.
Home Loan : स्वप्न होणार पूर्ण! ‘ह्या’ बँका देत आहे कमी व्याजदरात गृहकर्ज; पहा संपूर्ण लिस्ट