Reservation । मोठी बातमी! आरक्षणासंदर्भात आज सर्व पक्षीय महत्त्वाची बैठक, घेतले जाणार ‘हे’ निर्णय

Reservation । राज्यात दिवसेंदिवस आरक्षणाचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज आरक्षणावरून पेटून उठला आहे. त्यामुळे राज्य सरकारची दोन्ही बाजूने कोंडी होताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे देखील आक्रमक झाले आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठवाडा खूप संवदेनशील झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्यात लोकसभेत भाजपाचे दोन नेते खासदारकीची निवडणूक हरले आहेत. बीडमधून पंकजा मुंडे तर जालनातून माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मोठा मताने पराभव झाला.

अशातच सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आणि मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकांवर निकाल प्रलंबित असून आता याच पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचे आज मुंबईत आयोजन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

महत्त्वाचे म्हणजे या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही आमंत्रण दिले आहे.

13 जुलैपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणारा सगे-सोयऱ्याचा अध्यादेश काढण्यासाठी डेडलाईन राज्य सरकारला देण्यात आली आहे. सगे सोयरे अध्यादेशाच्या विरोधात मंत्री छगन भुजबल आणि मनोज जरांगे यांच्यात अजूनही वाद सुरुच आहेत. सगे सोयरे अध्यादेशाच्या विरोधात आणि बाजूने अशा आतापर्यंत एकूण 8 लाख हरकती राज्य सरकारकडे आल्या असून हा डाटा गुप्त असल्याने आजच्या बैठकीत मांडला जाणार नाही असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment