Renault Upcoming Cars : बाजारात लवकरच धुमाकूळ घालणार हायब्रिड इंजिन असणाऱ्या कार्स, किंमत असेल…

Renault Upcoming Cars : भारतीय बाजारात लवकरच Renault आपल्या दोन कार्स लाँच करणार आहे. या कारमध्ये हायब्रिड इंजिन आणि 12 इंच स्क्रीन असेल. कंपनीच्या या कारचे नाव Renault Alpine A290 आणि Renault Grand Koleos असणार आहे.  जाणून घेऊयात किंमत आणि फीचर्स.

Renault Alpine A290

Renault ची ही पुढील पिढीची कार असून ज्यात 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे. कंपनीने नुकतेच या कारचे अनावरण केले आहे. 2025 च्या मध्यापर्यंत भारतात लॉन्च होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, कारमध्ये 52 kWh चा बॅटरी पॅक असेल, जो सुमारे 400 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल. कंपनीने सध्या त्याच्या किंमतींचा खुलासा केला नाही, पण कारची सुरुवातीची किंमत 35 लाख रुपये एक्स-शोरूमपर्यंत असू शकते. रेनॉल्ट या कारमध्ये 10.1 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट देईल.

Renault Grand Koleos

कंपनीने नुकतेच दमदार SUV कारचे अनावरण केले असून ज्यात 1.5 लीटर हायब्रिड पेट्रोल इंजिन मिळेल. यात इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी हायब्रिड इंजिनसोबत जोडली आहे. ही एक उच्च श्रेणीची कार असून कारच्या मागील सीटवर 12.3 इंच स्क्रीन असेल.

रेनॉल्टच्या या कारमध्ये टर्बो इंजिनचा पर्याय मिळेल. ही कार हाय पिकअपसाठी 245 एचपी पॉवर जनरेट करू शकते. या कारची लांबी 4780mm असेल, या SUV ला जबरदस्त ग्राउंड क्लीयरन्स मिळेल, सध्या कंपनीने भारतात या कारच्या लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. पण कार 2025 च्या मध्यापर्यंत भारतात सादर होईल. त्याची किंमत एक्स-शोरूम 35 लाख रुपये असू शकते.

Leave a Comment