8 लाख का? अवघ्या 3 लाखात घरी आणा 7 सीटर Renault Triber; ऑफर जाणुन व्हाल थक्क

Renault Triber Offers: जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. तुम्ही या संधीचा फायदा घेत आता भारतीय बाजारपेठेमध्ये धुमाकूळ घालणारी 7 सीटर Renault Triber अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.

 भारतीय बाजारात Renault Triber हे चार ट्रिममध्ये उपलब्ध असून 10 व्हेरियंटमध्ये विकली जात आहे. बाजारात या कारची किंमत 5.91 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.20 लाख रुपयांपर्यंत जाते.

 Renault Triber मध्ये तुम्हाला 999 cc चे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याच बरोबर यात 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील आहे जे 100 पीएस पॉवर आणि 160 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते.

पाच स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येत असलेली ही एमपीव्ही रहदारीमध्येही अतिशय आरामात चालते. कंपनीचा दावा आहे की ही कार 20 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देते.

 Renault Triber Offer

मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट उपलब्ध नसेल तर तुम्ही ही कार सेकंड हॅण्ड देखील खरेदी करू शकतात. होय, सध्या 3 लाख रुपयांमध्ये तुम्ही ही कार खरेदी करू शकता.

OLX या वेबसाइटवर 2017 मॉडेल Renault Triber ची किंमत 300000 आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ऑफ-मार्केट सीएनजी किट बसवून त्याचे मायलेज आणखी वाढवू शकता.

Car Dekho या वेबसाइटवर Renault Triber ची किंमत 4,85,000 आहे. ही 2018 मॉडेलची कार आहे. जर तुम्हाला उत्तम 7 सीटर कार चांगल्या स्थितीत हवी असेल तर तुम्ही याकडे पर्याय म्हणून पाहू शकता. कारची संपूर्ण माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Leave a Comment